Rajasthan viral video woman molestation on bike incident : दुचाकीवर मागे बसलेल्या तरूणीच्या टॉपमध्ये एका नराधम तरूणाने हात घातल्याची संतापजनक घटना घडली आहे. भररस्त्यावर धावत्या दुचाकीवर जात असताना एका तरूणाने मुलीच्या टॉपमध्ये हात घातल्याचा व्हिडिओ समोर आलाय. राजस्थानमधील हा संतापजनक प्रकारामुळे नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेसने हा व्हिडिओ एक्सवर शेअर करत भाजपवर निशाणा साधलाय. भररस्त्यात गंदी बात करणाऱ्या नराधमाला धडा शिकवा, असे मत काही नेटकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. हा सर्व प्रकार एका दुचाकी चालकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
व्हिडिओत तरुण रस्त्याच्या मधोमध दुचाकीवरील एका तरुणीचा विनयभंग करून निघून जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दुसर्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर एका व्यक्तीला चार-पाच जण बेदम मारत असल्याचे दिसत आहे. हे दोन्ही व्हिडिओ राजस्थान काँग्रेसने एक्स खात्यावर शेअर केले आहे. राजस्थानमध्ये भाजपचे सरकार आहे, काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडवली आहे. व्हिडिओ पोस्ट करतानाच काँग्रेसने म्हटले की, 'हे लाजीरवाणे व्हिडिओ राजस्थानमधील आहेत. बहिणी आणि मुलींचा रस्त्यावर छळ होत आहे, आणि गुंड व गुन्हेगार सामान्य लोकांवर हल्ला करत आहेत. हे सर्व भाजपच्या गैरकारभारामुळे होत आहे. सरकार फक्त मुके होऊन सर्व पाहत आहे.'
भररस्त्यात गंदी बात!
जयपूरमध्ये भररस्त्यावर एका तरुणीच्या विनयभंगाचा व्हिडिओ समोर आले आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राजस्थान काँग्रेससह अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. एक तरुणी बाईकवर मागे बसलेली दिसत आहे, तर दोन तरुण तिच्या मागे बाईकवरून येत आहेत. मागे बसलेला नराधम तरुण मागून त्या तरुणीच्या टॉपमध्ये हात घालत असल्याचे दिसतेय. तरूणीने त्याच्यावर हात उचलला, पण तोपर्यंत दुचाकी पुढे निघून गेली होती.
राजस्थान काँग्रेसने एक्स खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांकडून या व्हिडिओवर आपला संताप व्यक्त केला आहे. पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचेही काही नेटकऱ्यांनी सांगितले आहे. नराधमाला शिक्षा द्यायलाच हवी, पोलिसांनी त्याला शोधून चोप द्यावा, असेही काही जणांनी म्हटले आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही राग आवरणार नाही. या व्हिडिओची साम टीव्ही पु्ष्टी करत नाही, अथवा अशा कृत्याचा आम्ही विरोध करतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.