Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! eKYC साठी मुदत वाढवली; वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणींना ईकेवायसीमध्ये चुक सुधारण्याची आणखी एक संधी देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana eKYCSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी

ईकेवायसीमध्ये चुक सुधारण्याची एक संधी मिळणार

मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना ईकेवायसीमध्ये चुक सुधारण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. आता महिलांना पुन्हा एकदा केवायसी करता येणार आहे. केवायसी करण्यासाठी मुदतवाढ वाढवून दिल्याने महिलांना दिलासा मिळाला आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरेंनी घोषणी केली आहे.

Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana: पुण्यात लाडकी बहीण योजनेचे पुरूष लाभार्थी, १२०० जणांनी महिन्याला ₹१५०० लाटले, धक्कादायक माहिती समोर

आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या? (Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension)

आदिती तटकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत ई केवायसी दुरुस्तीची संधी ३१ मार्चपर्यंत असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी!e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला आहे.यामुळे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती.

Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana : धक्कादायक! eKYC करताना ७१० लाडक्या बहिणींची एक चूक झाली अन् ₹१५०० कायमचे बंद झाले, लिंग निवड करताना...

केवायसीची प्रोसेस कशी असणार? (Ladki Bahin Yojana eKYC)

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसी करायची आहे.

तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर जायचे आहे.

वेबसाइटवर तुम्ही ही संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ईकेवायसीमध्ये चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहेत'यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा काही प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याची उत्तरे द्यायची आहे.

यावेळी महिलांना योग्य उत्तरे द्यायची आहेत. कोणत्याही प्रकारची चुकीची उत्तरे दिल्यावर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात.

Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार का? जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com