मुंबईकरांसाठी खुशखबर! आता म्हाडा भाड्यानेही घरे देणार; पोर्टल कधी सुरू होणार?

MHADA to Launch Rental Homes Portal: म्हाडाकडून लवकरच भाडेतत्त्वावरील घरांसाठी स्वतंत्र धोरण. मुंबई आणि नवी मुंबईतील मुख्य लोकेशनवर घरे उपलब्ध होणार.
MHADA to Launch Rental Homes Portal
MHADA to Launch Rental Homes PortalSaam
Published On

मुंबई - नवी मुंबई अशा प्राईम लोकेशनवर आपलं स्वत: चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. हे स्वप्न उराशी बाळगून आपण सिटीमध्ये येतो. तसेच पैसे कमवून घर घेण्याचा विचार करतो. मात्र, गगनाला भिडणाऱ्या किमतीमुळे आपण घर घेणं टाळतो. घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा कायम सज्ज असते. म्हाडाच्या लॉटरीकडे आशेनं पाहिलं जातं. अशातच सर्वसामान्यांना म्हाडाकडून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

मुंबईसह मुंबई उपनगरांत नोकरी, शिक्षण आणि व्यावसायासाठी लोक येतात. मात्र, या लोकांना मुंबईत खिशाला परवडणारी घरे मिळत नाहीत. अनेकदा मुंबईत भाड्याची घरे अवघड होते. भाडंदरही जास्त असते. हीच समस्या लक्षात घेत म्हाडानं मोठं उचललं आहे. म्हाडाने भाडेतत्त्वावरील घरांसाठी स्वतंत्र धोरण आखण्यास सुरूवात केली आहे. घरांची विक्रीसह म्हाडा आता भाडेतत्त्वावरही सामान्यांना घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आहे.

MHADA to Launch Rental Homes Portal
शेतीचा वाद विकोपाला! मोठ्यानं लहान भावाला संपवलं; मृतदेह जाळून नाल्यात फेकला, नागपूर हादरलं

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार याचे धोरण तयार होत आहे. यासाठी स्वतंत्र पोर्टलही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना थेट म्हाडाची भाड्याने घरे मिळू शकणार आहेत. या निर्णयामुळे नोकरदार, विद्यार्थी तसेच स्थलांतरितांसाठी दिलासा मिळणार आहे. मुख्य म्हणजे ही भाड्याची घरे लोकांना मुंबई, नवी मुंबईसारख्या प्राईम लोकेशनवर मिळणार आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरे उभारण्यात आली आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळामार्फतही या योजनेंतर्गत हजारो घरे बांधण्यात आली आहेत. मात्र, उत्पन्न मर्यादा तसेच देशातील इतर ठिकाणी स्वत:चे घर नसण्याच्या अटींमुळे सुमारे ५२ हजारांहून अधिक घरे अद्यापही विक्रीविना पडून आहेत. ही घरे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्यास सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

MHADA to Launch Rental Homes Portal
१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओनंतर ५ मिनिट ३९ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल, AI की MMS खरा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com