

लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट
७१० पुरुषांन केला अर्ज
नंदुरबारमधील धक्कादायक माहिती समोर
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच पुन्हा पडताळणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेक आता पुरुषांनीही लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अनेक पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला आहे आता त्यांची यादी समोर आली आहे.
नंदुरबारमधील ७१० पुरुषांनी अर्ज केल्याची माहिती समोर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेत चक्क ७१० पुरुषांनी अर्ज केल्याची माहिती उघड झाली आहे. महिला आणि बालकल्याण विभागाने हे सर्व अर्ज तातडीने अपात्र ठरवले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, हे अर्ज कोणत्याही हेतूने भरले नसून अर्ज भरताना लिंग निवडताना चुकून पुरुष हा पर्याय निवडला आहे.अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पुरुष अर्जदारांना कोणताही लाभ मिळालेला नाही. मात्र इतक्या मोठ्या संख्येने तांत्रिक चुका झाल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आता या सर्व अर्जांची आणि कागदपत्रांची पुन्हा छाननी केली जात असून, अशा प्रकारे चुकीची माहिती नोंदवणाऱ्यांवर विभाग नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण योजनेत प्रश्नांसाठी चुकून चुकीचा पर्याय निवडल्याने केवायसींमध्ये अपात्र झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता त्यानंतर महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. यातून ज्या महिला पात्र ठरणार आहेत. त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये पात्र महिलांना ३ महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.