Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! जानेवारीचा हप्ता लांबणीवर जाणार? वाचा अपडेट

Ladki Bahin Yojana January Installment May Delay: लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. महिलांना जिल्हा परिषदेआधी पैसे मिळतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बातमी

आता जानेवारीचा हप्ता लांबणीवर जाणार

जिल्हा परिषद निवडणुकीआधी पैसे जमा न होण्याची शक्यता

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेत डिसेंबरपर्यंतचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. महिला आता जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद; तुमचं तर नाव नाही ना?

जानेवारी महिना संपला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे येतील, असं सांगण्यात येत होतं. मात्र, जानेवारीचा हप्ता अजून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

जानेवारीचा हप्ता अजून लांबणीवर जाणार? (Ladki Bahin Yojana January Installment Delay)

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितलं जात होतं. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. ७ तारखेला मतदान आणि ९ तारखेला निकाल लागणार आहे. असा परिस्थितीतही अजूनही योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे हा हप्ता आता निवडणूकीपूर्वी तरी येणार नाहीये.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Update: ₹१५०० बंद झालेल्या महिलांना दिलासा, लाडक्या बहि‍णींची पुन्हा होणार ईकेवायसी, प्रोसेस झाली सुरू

या महिलांना ३ महिन्याचे हप्ते एकत्र येणार?

लाडकी बहीण योजनेत केवायसीमधल त्रुटींमुळे अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. आता या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये ज्या महिला पात्र ठरतील त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यात तीन महिन्याचे ४५०० रुपये जमा करण्यात येतील, असं सांगितलं जात आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला अजितदादांचे नाव द्या, आमदाराने कारण सांगितले, मुख्यमंत्र्यांचे नाव घेत म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com