Income Tax Vacancy 2026: खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?

Income Tax Department Recruitment: आयकर विभाहात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. गुजरात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.
Income Tax Vacancy 2026
Income Tax Vacancy 2026Saam Tv
Published On
Summary

आयकर विभागात नोकरीची संधी

इन्कम टॅक्स ऑफिसर आणि मल्टी टास्किंग ऑफिसर पदासाठी भरती

पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय?

सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयकर विभागात सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. चांगल्या पदावर काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. गुजरात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे.

Income Tax Vacancy 2026
NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी; १६२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

गुजरातमधील आयकर विभागात टॅक्स असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी incometaxgujarat.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

आयकर विभागात काम करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एकूण ४६ जागांवर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ रोजी सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०२६ आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे.

टॅक्स असिस्टंट पदासाठी १८-२७ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. एमटीएस पदासाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

पगार

टॅक्स असिस्टंट पदासाठी पे लेव्हल ४ नुसार २५५०० ते ८११०० रुपये पगार मिळणार आहे. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी पे लेव्हल १ नुसार १८००० ते ५६९०० रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता

टॅक्स असिस्टंट पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत डेट एंट्री येत असावी. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत उमेदवारांना खेळाचे ज्ञान असायला हवे. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेला असावा.

Income Tax Vacancy 2026
Bank Jobs: खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी; ६०० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

अर्ज कसा करावा?

तुम्हाला सर्वात आधी incometaxgujarat.gov.in वर जायचे आहे.

यानंतर भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा. यानंतर ज्या पदासाठी अर्ज करायचाय त्यावर क्लिक करा.

यानंतर नाव, जन्मतारीख, लिंग, स्पोर्ट्स अशी सर्व माहिती भरा. यानंतर कागदपत्र अपलोड करा.

यानंतर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरुन अपलोड करा. यानंतर अर्ज सबमिट करावा.

Income Tax Vacancy 2026
Prasar Bharti Job: प्रसार भारतीमध्ये सरकारी नोकरीची संधी; पात्रता काय? अर्ज कसा करावा? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com