Ladki Bahin Yojana: पुण्यात लाडकी बहीण योजनेचे पुरूष लाभार्थी, १२०० जणांनी महिन्याला ₹१५०० लाटले, धक्कादायक माहिती समोर

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १२०० पुरुषांनी लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

पुणे जिल्ह्यात लाडक्या बहिणींची पडताळणी

पुण्यात १,२०१ पुरुष लाभार्थी असल्याची माहिती

लाभार्थ्यांची पडताळणी होणार

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील 'लाडक्या बहिणीं' ना 'ई-केवायसी' केल्यानंतरही अनुदानाचा लाभ मिळत नसल्याने त्या सव्वादोन लाख बहिणींची थेट पडताळणी होणार आहे. मात्र, आत्तापर्यंत जिल्ह्यातील १,२०१ पुरुष लाभार्थी लाभ घेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून त्यामध्ये सर्वाधिक हवेली, पुण्यातील ४८७ पुरुष लाभार्थ्यांचा समावेश आहे. आता 'ई-केवायसी' झालेल्या लाभार्थ्यांसह ते खरोखरच पुरुष लाभार्थी आहेत का याचाही शोध घेण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? ₹१५०० रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट

केवायसी करण्याचे आदेश

राज्यात 'लाडक्या बहिणीं'ना देण्यात येणाऱ्या दीड हजार रुपयांच्या अनुदानापासून अनेक बहिणी वंचित आहेत. सरकारने या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही प्रक्रिया करताना अनेक अडचणी आल्या होत्या. अर्ज दाखल केल्यानंतरही या महिलांना अनुदान सुरू झाले नाही. ज्यांच्या घरी चारचाकी आहेत त्यांना अनुदान सुरू राहिले. मात्र, ज्यांच्या घरी चारचाकी नाही, सरकारी नोकरी नाही किंवा पेन्शनही नाही अशा लाभार्थ्यांचे अनुदान बंद झाले. अनेक लाभार्थी महिलांनी तक्रारी केल्याने त्यांची दखल घेत महिला व बाल विकास विभागाने ई-केवायसी करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रशासनाला शोध घेण्याचा आदेश

पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे सुमारे वीस लाख लाभार्थी आहेत. त्यापैकी राज्य सरकारला पुरुषांची नावे असलेली काही लाभार्थी आढळलेले आहेत. लाडकी बहीण योजनेचा महिलांप्रमाणे पुरुषही लाभ घेत असल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे. त्या पुरुष लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? ₹१५०० रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट

लाभार्थ्यांची खातरजमा करण्याचे सरकारने ठरवले आहे. त्याबाबत संबंधित जिल्ह्यातील प्रशासनाला पुरुष लाभार्थ्यांचा शोध घेण्याचा आदेश दिला आहे. पुणे जिल्ह्यात १,२०१ पुरुष लाभार्थी आढळले. त्यामध्ये हवेली आणि पुणे तालुक्यात सर्वाधिक ४८७ लाभार्थी आढळले आहेत.

सरकारी नोकरदार असेल किंवा पेन्शनधारक कोणी असेल तर त्या कुटुंबातील लाभार्थी ही अपात्र ठरणार आहे. त्या दोन्ही पैकी कोणीही घरात नसेल किंवा त्याचे लाभार्थी नसतील तर ती महिला योजनेची लाभार्थी ठरेल. त्यानुसार जिल्ह्यात आता दोन लाख २५ हजार ३६० लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी! लाडक्या बहि‍णींच्या खात्यात खटाखट ₹४५०० येणार, कारण आले समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com