Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी! लाडक्या बहि‍णींच्या खात्यात खटाखट ₹४५०० येणार, कारण आले समोर

Ladki Bahin Yojana Women get 4500 Rupees: लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये त्रुटी आढळल्याने अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहे. आता या महिलांची पुन्हा केवायसी झाल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
Published on
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

या महिलांना मिळणार ₹४५०० रुपये

केवायसीमधील त्रुटी काढून टाकल्यानंतर महिलांना मिळणार लाभ

लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. दरम्यान, आता या महिलांना १५०० रुपये मिळणे बंद झाले आहे. जवळपास लाखो महिलांचा लाभ बंद झाला आहे.त्यात अजूनही जानेवारीचा हप्ता आलेला नाही. त्यामुळे हा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. याचसोबत आता अजून एक अपडेट समोर आली आहे. या महिन्यात काही महिलांना ४५०० रुपये मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: 'लाडकी'मुळे राज्याच्या महसूलीत तूट; आर्थिक सर्व्हेक्षणात महाराष्ट्रावर ताशेरे

लाडक्या बहि‍णींना मिळणार ₹४५०० रुपये (Ladki Bahin Yojana Women Will Get 4500 Rupees)

आता फेब्रुवारी महिना सुरु झाला आहे तरीही महिलांना जानेवारीचे पैसे मिळाले नाहीत. याचसोबत अनेक महिलांनी केवायसीमध्ये चूक केल्याने त्यांना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. आता या महिलांना तिन्ही महिन्याचे पैसे एकत्र मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद; तुमचं तर नाव नाही ना?

ज्या महिलांची केवायसीमध्ये चूक झाली आहे त्यांच्या फेरपडताळणीचे निर्देश दिले आहेत. आता अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे. यातून ज्या महिला खरंच पात्र ठरतील त्यांचा लाभ सुरु ठेवला जाणार आहे. दरम्यान, लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्यातील अनेक महिला पात्र असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच पात्र महिलांना तीन महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला अजितदादांचे नाव द्या, आमदाराने कारण सांगितले, मुख्यमंत्र्यांचे नाव घेत म्हणाले...

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेतील तब्बल २० लाखांपेक्षा जास्त महिलांनी ई केवायसी बाकी आहे. दरम्यान, या महिलांना ई केवायसीसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली जात आहे. यासंदर्भात महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये आचारसंहिता संपल्यावर मुदतवाढ दिली जाईल, असं सांगण्यात आलं आहे. याबाबत सकाळ माध्यमाने वृत्त दिलं आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! जानेवारी-फेब्रुवारीचे ₹३००० एकत्र येणार? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com