Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! जानेवारी-फेब्रुवारीचे ₹३००० एकत्र येणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana January-February Installment May Come Together: लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. लाडकी बहीण योजनेत जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

जानेवारीचा हप्ता लांबणीवर जाणार

जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

जानेवारी महिना संपला आहे तरीही लाडक्या बहि‍णींना हप्ता मिळालेला नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता कधी येणार याची वाट महिला पाहत आहेत. दरम्यान, जानेवारीसोबतच फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का असा प्रश्नदेखील विचारला जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: ₹१५०० बंद झाले, लाडक्या बहिणी आक्रमक, थेट महिला व बालविकास केंद्रात घुसल्या, पाहा व्हिडिओ

लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता लांबणीवर (Ladki Bahin Yojana January Installment may Delay)

लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. फेब्रुवारी महिना सुरु झाला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

मागील अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात होती.दरम्यान, आता हा हप्ता आणखी पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचसोबत आता फेब्रुवारीच्या हप्त्याबाबतही प्रश्न विचारले जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: e-KYC मध्ये चूक! लाडकीची यादी अंगणवाडी सेविकांकडे पोहचली, आता घरोघरी जाऊन होणार पडताळणी

जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता (Ladki Bahin Yojana January-February Installment May Come Together)

लाडकी बहीण योजनेत जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर जानेवारीचा हप्ता आणखी लांबणीवर गेला तर दोन्ही हप्त्याचे ३००० रुपये एकत्र येऊ शकतात.याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडणार? महत्त्वाचं कारण आले समोर, वाचा सविस्तर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com