Ladki Bahin Yojana: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार का? जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana January Installment Update: लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान, उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी पैसे मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

जिल्हा परिषदेआधी लाडकीचा हप्ता येणार?

महिलांच्या मनात संभ्रम

लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. जानेवारी महिना संपून आता फेब्रुवारीचाही पहिला आठवा संपत आला आहे. तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाला आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana eKYC: २० लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० कायमचे बंद, ईकेवायसीबाबत महत्त्वाची अपडेट

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं सांगण्यात येत होते.मात्र, अजूनही पैसे आलेले नाहीत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याआधी जानेवारीचा हप्ता जमा होण्याची अपेक्षा होती. मात्र, आता उद्यापर्यंत लाडकीच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे कदाचित जानेवारीचा हप्ता आणखी लांबणीवर जाऊ शकतो. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

जिल्हापरिषदेआधी का येणार होता लाडकीचा हप्ता?

याआधीही निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले होते. नगरपरिषद, महानगरपालिका निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यामुळे झेडपी निवडणुकीआधी पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! काही महिलांना मिळणार ₹१५०० तर काहींना ₹४५००; तुम्हाला किती मिळणार?

या महिलांना मिळणार नाही पैसे (Ladki Bahin Yojana These Women Will Not Get ₹1500)

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये. ज्या महिलांनी केवायसी केले नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. याचसोबत ज्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी पडताळणी होत आहे. त्यांचाही हप्ता लांबणीवर जाणार आहे. महिलांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: गुड न्यूज! लाडकींना ३ महिन्यांचे ₹४५०० एकत्रित मिळणार, उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com