Ladki Bahin Yojana: गुड न्यूज! लाडकींना ३ महिन्यांचे ₹४५०० एकत्रित मिळणार, उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Deputy CM Eknath Shinde: लाडक्या बहिणींना ३ महिन्यांचे ४५०० रुपये एकत्रित मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली. जुन्नर येथे झालेल्या प्रचार सभेच त्यांनी ही घोषणा केली.
Ladki Bahin Yojana: गुड न्यूज! लाडकींना ३ महिन्यांचे ₹४५०० एकत्रित मिळणार, उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

Summary -

  • लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी

  • तीन महिन्यांचे ४५०० रुपये एकत्रित मिळणार

  • ई-केवायसी त्रुटीमुळे थांबलेले पैसे आता लवकरच खात्यात जमा होणार

  • अंगणवाडी सेविकांकडून लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू

रोहिदास गाडगे, पुणे

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या लाडक्या बहिणींना ई-केवाईसी प्रक्रियेमुळे लाभ मिळाला नाही त्यांच्या खात्यात लवकरच ४५०० रुपये जमा होणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना ३ महिन्यांचे ४५०० रुपये एकत्रित मिळणार असल्याची घोषणा राज्याचे उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची जुन्नरमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी लाडक्या बहिणींना ४५०० एकत्रित मिळणार असल्याचे सांगितले.

Ladki Bahin Yojana: गुड न्यूज! लाडकींना ३ महिन्यांचे ₹४५०० एकत्रित मिळणार, उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी; लाखो महिलांचा लाभ बंद; तुम्हाला जानेवारीचे ₹१५०० येणार की नाही? वाचा सविस्तर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 'लाडकी बहिण योजना आवडती योजना आहे. आईच्या प्रेरणीतून लाडकी बहिण योजनेची संकल्पना आली. लाडकींना ३ महिन्याचे ४५०० रुपये एकत्रित मिळतील. लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायावर उभं करायचं आहे. लाडक्या बहिणी लखपती होताना पहायचं आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार असे आश्वासन दिले तेही लवकर पूर्ण होणार आहे.'

Ladki Bahin Yojana: गुड न्यूज! लाडकींना ३ महिन्यांचे ₹४५०० एकत्रित मिळणार, उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana: ३५ लाख लाडक्या बहि‍णींचा हप्ता रखडणार, ₹१५०० न मिळण्याचे कारण आले समोर

ई-केवायसीमध्ये चूक झाली त्यामुळे लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थी महिलांचा लाभ बंद झाला आहे. या लाडकींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांच्या हफ्त्याचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे या लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. हफ्त्याचे पैसे मिळावे यासाठी त्यांनी आंदोलनं देखील केली होती. आता या लाडक्या बहिणींना लवकरच पैसे मिळणार आहेत. त्यांची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी सुरू आहे. या ई-केवायसी प्रक्रियेत काही त्रुटी न आढळल्यास आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना ३ महिन्यांचे एकत्रित पैसे मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana: गुड न्यूज! लाडकींना ३ महिन्यांचे ₹४५०० एकत्रित मिळणार, उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! काही महिलांना मिळणार ₹१५०० तर काहींना ₹४५००; तुम्हाला किती मिळणार?

एकनाथ शिंदे यांनी ते मुख्यमंत्री असताना ज्या योजना सुरु केल्या होता त्याचा उल्लेख सभेत केला. त्यांनी सांगितले की, 'सरकारच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा आधिकार आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत बैठक झाली. यासाठी कमिटी गठीत केलीय. अहवाल आल्यावर त्यावर अंमलबजावणी होईल.' तसंच यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला. 'तुम्ही काही दिलं नाही आम्ही देतोय तरी टीका करताय.', असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Ladki Bahin Yojana: गुड न्यूज! लाडकींना ३ महिन्यांचे ₹४५०० एकत्रित मिळणार, उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana : धक्कादायक! eKYC करताना ७१० लाडक्या बहिणींची एक चूक झाली अन् ₹१५०० कायमचे बंद झाले, लिंग निवड करताना...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com