Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! काही महिलांना मिळणार ₹१५०० तर काहींना ₹४५००; तुम्हाला किती मिळणार?

Ladki Bahin Yojana January Insallment Update: लाडकी बहण योजनेच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही महिलांच्या खात्यात १५०० रुपये तर काही महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा केले जाणार आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेत ट्विस्ट

काही महिलांना मिळणार ₹१५००

या महिलांना मिळणार ₹४५००

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारीच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. आता फेब्रुवारी महिना सुरु झाला आहे तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेत काही महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत तर काही महिलांना ४५०० रुपये मिळणार आहे. तीन हप्त्यांचे रखडलेले पैसे एकत्र येणार आहेत. यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार हे जाणून घ्या.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! जानेवारीचा हप्ता लांबणीवर जाणार? वाचा अपडेट

या महिलांना मिळणार १५०० रुपये (Ladki Bahin Yojana January Installment Date)

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचा लाभ सुरु आहे. त्यांना यापुढेही योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व निकषात पात्र महिलांना लाभ दिला जातो. त्यांचा लाभ यापुढेही असाच सुरु राहणार आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसी केले आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

या महिलांना मिळणार ₹४५०० (Ladki Bahin Yojana these women will get 4500 rupees)

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना ४५०० रुपये दिले जाणार आहेत. ३ महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत. केवायसीमध्ये अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली आहे. या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. यातील पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी; लाखो महिलांचा लाभ बंद; तुम्हाला जानेवारीचे ₹१५०० येणार की नाही? वाचा सविस्तर

अनेक महिलांना नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता दिलेला नाही. काही त्रुटींमुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. दरम्यान, प्रत्यक्ष पडताळणीत पात्र ठरलेल्या महिलांना तीन महिन्याचे ४५०० रुपये एकत्र येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही केवायसी केली असेल आणि निकषात बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : धक्कादायक! eKYC करताना ७१० लाडक्या बहिणींची एक चूक झाली अन् ₹१५०० कायमचे बंद झाले, लिंग निवड करताना...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com