

लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद
जानेवारीचा हप्ता मिळणार का?
या महिलांना मिळणार ₹४५००
लाडकी बहीण योजनेवर अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. या महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपासून हप्ता मिळालेला नाही. यामुळे महिलांच्या मनात खूप संभ्रम निर्माण झाा आहे. निकषात बसून केवायसी करुनही खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान, आता महिलांना जानेवारीचा हप्ता तरी मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
लाखो महिलांचे अर्ज बाद, जानेवारीचा हप्ता मिळणार का? (Ladki Bahin Yojana January Installment Update)
लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. केवायसी करताना अनेक महिलांकडून चुकीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. आता या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर निकषात बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांची पुन्हा ई केवायसी सुरु केली आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन ई केवायसी करणार आहे. त्यामुळे त्यातून महिलांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत तर नाही ना, उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नाही ना या सर्व बाबी तपासल्या जाणार आहेत. यामुळे यातून ज्या महिला पात्र ठरतील त्यांनाच पुढे योजनेचा लाभ मिळणार आहे.
या महिलांना मिळणार ₹४५०० रुपये (These Women Will Get 4500 Rupees)
लाडकी बहीण योजनेत केवायसीत चूक झालेल्या महिलांचे लाभ बंद झाले आहे. यातून आता ज्या महिला पात्र ठरतील त्यांना ३ महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.