Income Tax Slab: टॅक्स भरणाऱ्यांना दिलासा नाहीच; अर्थसंकल्पात नेमकी काय घोषणा झाली?

New Income Tax Slab News: अर्थसंकल्पामध्ये कदरदात्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान कर मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Income Tax Slab
Income Tax SlabSaam Tv
Published On
Summary

करदात्यांसाठी महत्वाची बातमी

कर मर्यादेत कोणताही बदल नाही

१२ लाखांचे उत्पन्न टॅक्स फ्री

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज देशाचे अर्थसंकल्प सादर केले आहे. यामध्ये टॅक्सबाबत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळालेला नाही. कर मर्यादेत कोणतीही वाढ करण्यात आले नाही.

Income Tax Slab
Union Budget 2026: रुग्णांना दिलासा! मधुमेह आणि कॅन्सरची औषधं स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

आयकर मर्यादेत कोणताही बदल नाही (Income Tax Slab did not Change)

अर्थसंकल्पात करमर्यादा १२ लाखांपर्यंत निश्चित करण्यात आली होती. आता यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याआधी नवीन कर प्रणालीअंतर्गत ४ लाखांच्या उत्पन्नापर्यंत करमुक्त होता. दरम्यान आता कलम 87 अंतर्गत १२ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाहीये. त्यामुळे यावर्षी करमर्यादा वाढवण्यात आलेली नाही. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला नाही.

Income Tax Slab
Budget 2026: सोने-चांदीचे दर स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

कर मर्यादा (New Tax Slab)

४ लाखांच्या उत्पन्नावर कर नाही

४ ते ८ लाखांवर ५ टक्के कर

८ ते १२ लाखांवर १० टक्के कर

१२ ते १६ लाखांवर १५ टक्के कर

१६ ते २० लाखांवर २० टक्के कर

२० ते २४ लाखांच्या उत्पन्नावर २५ टक्के कर

याचसोबत कलम ८७ अ अंतर्गत १२ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही

Income Tax Slab
New Income Tax Act: अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा! नवीन आयकर कायदा १ एप्रिलपासून लागू

करदात्यांसाठी अजून काही महत्त्वाच्या घोषणा

१ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. यामध्ये आयकर नियम अजूनच सोपे केले आहेत. यामुळे तुम्हाला आयटीआर फाइल करणे आणखी सोपे जाणार आहे. आयकर रिटर्न फाइल करण्याची प्रोसेस सोपी आणि सरळ होणार आहे.

Income Tax Slab
Income Tax Refund Delay: ITR च्या रिफंडसाठी एक वर्षापर्यंत पाहावी लागेल वाट, काय आहे कारण? परतफेडीवर व्याज मिळेल का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com