

अर्थसंकल्प 2026 मध्ये मधुमेह व कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा.
औषधांच्या किमती स्वस्त करण्याची घोषणा.
३ केमिकल पार्क आणि सेमीकंडक्टरसाठी ४० हजार कोटींचा निधी.
आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा चालना देणारे निर्णय.
Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी मधुमेह आणि कॅन्सर या गंभीर आजारासंदर्भात मोठी घोषणा केली. मधुमेह आणि कॅन्सरची औषधं स्वस्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मधुमेह आणि कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.
मधुमेह आणि कॅन्सरची औषधं खूप महाग असतात. ही औषधं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. त्यामुळे या औषधांचे दर कमी करण्यात यावेत अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता या आजारासंदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली. अर्थमंत्र्यांनी या आजाराच्या औषधाच्या किंमतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेत रुग्णांना दिलासा मिळाला.
अर्थमंत्र्यांनी घोषणा करताना सांगितले की, 'मधुमेह आणि कॅन्सरची औषधं स्वस्त करण्यात येणार आहेत. भारताला औषध निर्मितीचे केंद्र बनवणार आहोत. ३ मोठ्या केमिकल पार्कची स्थापना केली जाईल. सेमी कन्डक्टर क्षेत्रावर जास्त भर देण्यात येईल. सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी तब्बल ४० हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली. लोकांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.