ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आईसक्रिम ही वस्तू सर्वांनाच खूप आवडते. पण काही मधुमेह असणाऱ्या लोकांना गोड खाण्याआधी विचार करावा लागतो.
मधुमेह असणारे रुग्ण बाहेर आईसक्रीम कुल्फी खाण्यास घाबरतात. तुम्ही त्यांच्यासाठी घरच्या घरी शुगर फ्री कुल्फी बनवू शकता.
शुगर फ्री कुल्फी बनवण्यास खूप सोपे आहे. ती बनवण्यास फक्त अर्धातास लागतो. तर जाणून घ्या रेसिपी
फुल क्रिम दूध, काजू, बदाम, वेलची , गुळ आणि केशर इत्यादी साहित्य लागते.
सर्वात आधी काजू बदामला मिक्सरमध्ये बारिक करुन घ्या. त्याच बरोबर वेलचीसुध्दा सोलून घ्या.
गुळाचे छोटे तुकडे करा आणि ते बारीक वाटून घ्या जेणेकरून ते दुधात विरघळेल.
एका भांड्यात दूध घ्या आणि ते गरम करत ठेवा. दूध थोडे जाडसर होईपर्यंत शिजवून घ्या.
गॅसवर असलेल्या दूधामध्ये तयार केलेली काजू आणि बदामची पेस्ट, गुळ, वेलचीचे दाणे आणि केशर हे सगळ साहित्य दूधात टाकून शिजवून घ्या.
आता दूध थंड होऊ द्या. नंतर ते मिक्सरमध्ये घालून बारीक करा. नंतर ते कुल्फी ट्रेमध्ये ठेवा आणि रात्रभर फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या.
आता तुमची कुल्फी तयार आहे. आनंद घेत तुम्ही कुल्फी खाऊ शकता. मधुमेहाचे रुग्ण सुध्दा ही कुल्फी आवडीने खातील काहिच नुकसान होणार नाही.