ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बाजारात मिळणाऱ्या नूडल्समध्ये हानिकारक प्रिझर्व्हेटिव्ह्ज पदार्थ असतात. त्यामुळे, तुम्ही घरीच आरोग्यदायी आणि स्वादिष्ट गव्हाच्या पिठाच्या नूडल्स बनवू शकता.
गव्हाचे पीठ, पानी, तेल आवडीच्या भाज्या, फोडणीसाठी राई, जीरे, हिरवी मिरची आणि मसाले इत्यादी साहित्य लागते.
गव्हाचे पीठात मीठ आणि तेल मिक्स करुन पीठ मळून घ्या. काही काळ ठेवून पीठाला पातळ स्वरुपात मळून घ्या.
मळलेल्या पीठाला मोठ्या पट्ट्यांमध्ये कापून घ्या आणि वेगवेगळे पसरवून ठेवा.
उकळत्या पाण्यामध्ये तयार केलेले नूडल्स टाका. मग त्यात थोडे मीठ आणि तेल मिक्स करा. नूडल्स शिजवून घ्या.
फोडणीसाठी तेलामध्ये जीरे, राई, हिरव्या मिरच्या, मसाले आणि कापलेल्या भाज्या टाका.
तयार केलेल्या फोडणीत शिजवलेले नूडल्स मिक्स करा आणि सगळे मिश्रण एकजीव करुन घ्या.
घरच्या घरी टेस्टी आणि पौष्टिक बनवलेले नूडल्स तयार आहेत. ते सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा आणि खाण्याचा आनंद घ्या.