ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लौकी कोफ्ता हा एक भारतीय पदार्थ आहे, ज्यामध्ये दुधी भोपळ्यापासून बनवलेले कोफ्ते मसालेदार ग्रेव्हीमध्ये शिजवले जातात.
दुधी, बेसन, आलं लसून पेस्ट, टॉमेटो, कांदा, दही, मसाले आणि हिरवी कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
दुधी भोपळा किसून घ्या, त्यात बेसन पीठ मिक्स करा आणि त्याची भजी तळून घ्या.
कांदा आणि टॉमेटोची पेस्ट बनवून घ्या. मसाले तव्यावर भाजून घ्या आणि त्यात दही मिक्स करुन ग्रेव्ही बनवून शिजवून घ्या.
तळलेल्या कोफत्यांना गरम ग्रेव्हीमध्ये टाका आणि मंद आचेवर शिजवून घ्या.
कोथिंबीर आणि आल्याच्या तुकड्यांनी दुधी कोफ्ता सजवून घ्या जास्त आकर्षक दिसेल.
गरमा गरम दुधी कोफत्याला चपाती नान किंवा भातासोबत सर्व्ह करा.