ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाल मिरच्या बाजारात सहज उपलब्ध आहेत. भारतीय घरांमध्ये अनेक प्रकारची लोणची खाल्ली जातात. तसेच लाल मिरचीचे लोणचे सुध्दा मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते.
लाल मिरचीचे लोणचे चटपटीत आणि मसालेदार असते. ते चवीला अतिशय सुंदर लागते.
लाल मिरची, राईचे तेल, मसाले, ओवा, आमचूर पावडर, काळी राई, हळद, जीरे, सोफ आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
सर्वात आधी लाल मिरचीला धुवून घ्या आणि सुकवून घ्या. सुकल्यानंतर मिरचीचे देठ काढा आणि मधोमध काढून घ्या.
ओवा, सोफ आणि जीरे या साहित्यांना तव्यावर भाजून घेवून मिक्सरमध्ये बारिक करुन घ्या.
आता सगळे मसाले राईच्या तेलात मिक्स करा. त्यात मीठ आणि स्वादानुसार आमचूर पावडर टाका.
आता कापलेल्या मिरचीमध्ये तयार केलेला मसाला भरा. जितकी मिरची असेल तितकाच मसाला भरावा. मसाला ओव्हरलोड होऊन देऊ नका.
काचेच्या जारमध्ये राईचे तेल टाका आणि त्यातच मसाले भरलेल्या मिरच्या बुडवून ठेवा.
लोणचे तयार झाल्यावर दोन ते तीन वेळा जारला उन्हात ठेवावे. यानंतर तुम्ही लोणचे खाण्याचा आनंद घेवू शकता.