

सध्याच्या चुकीच्या जीवनशैलींमुळे अनेकांना त्यांच्या नकळत जीवनघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. अशातच काही लोक चांगली जीवनशैली फॉलो करायला नकार देतात. म्हणजेच काहीजण खूप जंक फूड खाऊन एकाच जागी बसून राहतात. साधे चालण्याचेही कष्ट घेत नाही. काहीलोक पाहिजे त्यावेळेस भरपूर पैसा खर्च करुन क्लबमध्ये मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये पार्टी करतात. तिथे दारु, सिगारेट यांसारख्या अमलीपदार्थांचे सेवन करतात. ती क्षणीक मजा तुम्हाला आयुष्यभर मोठ्या जीवघेण्या समस्यांना सामोरं जाण्याचं कारण बनू शकते.
तज्ज्ञांच्या संशोधनानुसार फुफ्फुसांचा कर्करोग हा भारतातील गंभीर आरोग्य समस्यांपैकी एक आहे. नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्राम आणि आयसीएमआरच्या अभ्यासानुसार देशातील सुमारे 9.3 टक्के कॅन्सर रुग्णांना हा आजार होतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा कॅन्सर आढळतो. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची लक्षणे ओळखणं कठीण असतं, त्यामुळे यावर उशिरा निदान होतं आणि उपचार लांबतात. यामुळे रुग्ण बरा होण्याची शक्यता कमी होते.
एचसीजी कॅन्सर सेंटरच्या वरिष्ठ ऑन्कोलॉजिस्ट डॉ. इंदू अंबुलकर यांनी सांगितलं की, फुफ्फुसांचा कॅन्सर (Lung Cancer) सुरुवातीच्या टप्प्यात सापडले तर उपचार लगेच करतात येतात. तसेच लक्षणांचा शरीरावर कमी परिणाम होतो आणि आजार वाढण्याआधीच उपचार सुरू करता येतात. त्यामुळे सामान्य वाटणारी लक्षणंसुद्धा गांभीर्याने घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
सतत खोकला येणं किंवा खोकल्याच्या स्वरूपात बदल होणं हे फुफ्फुसांच्या कर्करोगाचं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. सर्दी, ताप नसतानाही अनेक आठवडे खोकला सुरू असेल, खोकल्यातून कफ येत असेल किंवा खोकताना खूप त्रास होत असेल तर ते दुर्लक्षित करू नये. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हा धोका जास्त असला तरी धूम्रपान न करणाऱ्यांनीही सावध राहणं गरजेचं आहे.
जिने चढताना किंवा थोडंसं चालताना श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यामागे फुफ्फुसांमधील सूज किंवा श्वसनाच्या मार्गात अडथळा असण्याची शक्यता असते. छातीत, पाठीमध्ये किंवा खांद्यामध्ये सारख्या वेदना होत असतील तर त्या फक्त थकवा किंवा वाढत्या वयामुळे होत आहेत असं समजून दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. फुफ्फुसांचा कॅन्सर वाढत गेल्याने आसपासच्या ऊतींवर परिणाम होतो किंवा लिम्फ नोड्स सुजतात, त्यामुळे वेदना जाणवू शकतात. विशेषतः रात्री वेदना वाढत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.