Sakshi Sunil Jadhav
केसांची वाढ खुंटणं, कोंडा, कोरडे आणि निर्जीव केस ही समस्या आजकाल अनेकांना त्रास देतेय. महागडे हेअर प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरू शकतात. जाणून घ्या फायदे.
तुपामध्ये ओलावा टिकवून ठेवण्याचे गुणधर्म असतात. यामुळे कोरडे आणि निर्जीव केस पुन्हा मऊ व चमकदार होतात.
गरम तुपाने टाळूवर मसाज केल्यावर रक्ताभिसरण सुधारतं. त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळून केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होते.
तूप आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्याने टाळू स्वच्छ राहते. यामुळे कोंडा कमी होतो.
तुपामधील फॅटी अॅसिड्स केसांच्या मुळांना बळकट करतात. यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते.
तूप नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करतं. रात्रभर तुपाचा मसाज करून ठेवल्याने केस जास्त मऊ आणि सरळ होतात.
तुपाचा हेअर मास्क लावल्याने केसांचे टोक पोसले जातात आणि स्प्लिट एंड्सची समस्या कमी होते.
तुपाचा नियमित वापर केल्याने केस जाड, मजबूत आणि नैसर्गिक चमकदार दिसतात.
महागड्या हेअर स्पाऐवजी आठवड्यातून एकदा तुपाचा मसाज केल्यास केस निरोगी राहतात आणि खर्चही कमी होतो.