World Lung Cancer Day 2025: फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यास सुरूवातीला काय लक्षणं दिसतात? वेळीच व्हा सावध

Signs of Lung Cancer : फुफ्फुसाचा कर्करोग ओळखण्यासाठी सुरुवातीची लक्षणं ओळखणं अत्यंत आवश्यक आहे. सतत खोकला, दम लागणे, छातीत दुखणं ही संकेतं वेळेत ओळखून उपचार करा.
Symptoms of lung cancer
Symptoms of lung cancerFreepik/Depositphotos
Published On

तुम्हाला माहीत आहे का? देशात दरवर्षी हजारोंपेक्षा जास्त लोक फुफ्फुसाच्या कर्करोगाला बळी पडत असतात. यात जास्तीत जास्त लोकांना त्यांना यासारख्या गंभीर आजाराने घेरलेले आहे याची कल्पनाही नसते. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यास अनेक लोकांचा मृत्यू होतो. आश्चर्याची बाब म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग फक्त धूम्रपान करणाऱ्या लोकांनाच नाही तर, निर्व्यसनी लोकांना देखील होतो. यापासून वाचण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या आजाराची लक्षणं माहीत असणं आवश्यक आहे.

Symptoms of lung cancer
Swelling In Lungs: फुफ्फुसांना सूज आल्यावर शरीर देतं 'हे' मोठे संकेत; लक्षणं ओळखून वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

फुफ्फुसाचा कर्करोग हा एक असा आजार आहे ज्यात फुफ्फुसांमधील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि ट्यूमर तयार करतात. हे ट्यूमर वाढल्यास श्वास घेण्यास त्रास, खोकला, छातीत दुखणे आणि इतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागांमध्ये पसरल्यास मेंदू, हाडे, यकृत आणि शरीराच्या महत्त्वपूर्ण कार्यांना नियंत्रित करणाऱ्या अधिवृक्क ग्रंथीवर देखील परिणाम करू शकतात.

फुफ्फुसाच्या कर्करोगाचे मुख्य कारण धूम्रपान आहे पण हवेतील प्रदूषण, रासायनिक घटक आणि इतर विषारी पदार्थांच्या संपर्कात आल्याने देखील फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. जर तुम्हालाही पुढील काही लक्षणं जाणवत असतील तर, आताच सावध व्हा...

१. कधी बरा न होणारा खोकला आणि खोकताना तोंडातून रक्त येणे.

२. श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत वेदना होणे आणि जडपणा वाटणे

३. भूक न लागणे आणि अचानक वजन कमी होणे

४. वारंवार न्यूमोनिया किंवा ब्रॉंकायटिस सारखे फुफ्फुसांचे इन्फेक्शन होणे.

Symptoms of lung cancer
Healthy Fruits: 'या' फळांचे सेवन केल्यास फुफ्फुस होतील निरोगी

तुम्ही बऱ्याच काळापासून धूम्रपान करत असाल तर, नियमित सीटी स्कॅन किंवा छातीची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. १ ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस या गंभीर आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. यादिवशी तुम्हीही तुमच्या शरीराची तपासणी करून घ्या. वरील कोणतेही लक्षण दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळेवर उपचारास सुरूवात करा.

Symptoms of lung cancer
Lungs Disease : श्वास घेण्यास त्रास होत असेल तर असू शकतो; फुफ्फुसांचा आजार, वेळीच व्हा सावध

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com