शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक अवयवाला सुरळीत काम करणे गरजेचे आहे. शरीरातील प्रत्येक अवयव हे तितकेच महत्वाचे आहे. बदलती जावनशैली, वाढते प्रदूषण आणि धूम्रपान सारख्या गोष्टींमुळे फुफ्फुसांच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कोरोना सारख्या महामारीनंतर या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. फुफ्फुस आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करतात. आणि कार्बनडायऑक्साईड वायूला बाहेर काढतात. फुफ्फुसांचे योग्यरित्या काम करणे शरीरासाठी गरजेचे आहे. धूम्रपान सारख्या सवयींमुळे फुफ्फुसांना अनेक नुकसान होतात. त्यामुळे भविष्यात अनेक आजार होण्याची शक्यता असते. तसेच पुफ्फुस (Lungs) निकामी होण्याची शक्यता असते. म्हणून फुफ्फुसांची वेळोवेळी काळजी घेणे गरजेचे आहे.
फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.फळांचा आहारात समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. काही फळे शरीरांच्या अवयवासाठी औषध म्हणून काम करतात. त्यातच काही फळे फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. ते फुफ्पुसांना शुद्ध करण्याचे काम करतात. या फळांचे सेवन केल्यास तुम्हीही तुमच्या फु्फ्फुसांची योग्यरित्या काळजी घेऊ शकता.
१. द्राक्षे
द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी ( Vitamin C ) भरपूर प्रमाणात असतात. ते फु्फ्पुसांची जळजळ आणि सूजण कमी करण्यास मदत करतात. द्राक्षांमध्ये रेसवेराट्रोल नावाचा पदार्थ आढळला जातो. जे श्वसननलिका संबधित आजारांचा धोका कमी करण्याचे काम करतात. तसेच श्वसननलिकेला साफ करत शुद्ध करण्याचे काम करतात.
२ .अननस
अननसामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते. व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते, तसेच अननस या फळामध्ये ब्रोमेलेन नावाचा एन्झाइम असतो. जो श्वसननलिकेला शुद्ध करण्याते काम करतो. तसेच पचनाला होणारा त्रास आणि जळजळ कमी करतो. अननसमध्ये ब्रोमेलेन एन्झाइम फुफ्फुसांला निरोगी ठेवण्यास मदत करतात. आणि फु्फ्फुसांमध्ये जमा झालेल्या कफला बाहेर काढण्यास मदत करतात.
३. पपई
पपई हे फळ आरोग्यासाठी चांगले असते. हे तर आपल्या सर्वाना माहितच आहे. पपई या फळात अशे गुणधर्म आहेत, जे फुफ्फुसांसाठी सर्वोत्तम ठरतात. पपईमध्ये पपेन नावाचा एन्झाइम आढळतो. पपेन हे पपईच्या झाडाच्या लेटेक्समधून काढलेले एन्झाइम असते. हे एन्झाइम श्वसननलिकेला शुद्ध करतात. तसेच पुफ्फुसांमधील कफ साफ करण्यास मदत करतात. आणि पु्फ्फुसांना डिटॅाक्स करण्याचे काम करतात. पपई मध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुण असतात.जे फुफ्फुसांची सूजन कमी करण्यासाठी मदत करतात.
४. सफरचंद
दररोज सफरचंद खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. सफरचंदमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट( Antioxidants) , फायबर आणि व्हिटॅमिन सी फु्फ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच फु्फ्फुसांतील घाण साफ करतात.आणि शरीराला ऊर्जा प्रदान करतात.
५. लिंबू
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात अँटिऑक्सिडंटचे प्रमाण सुद्धा अधिक असते. त्यामुळे लिंबूचा रस गरम पाण्यामध्ये टाकून प्यायल्यास श्वसनलनलिका साफ होण्यास मदत करतात.आणि पु्फ्फुसांतील संक्रमण रोखण्याचे काम करतात. लिंबू शरीराला डिटॅाक्स करतात आणि विषारी घटक शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतात.
Edited by : Priyanka Mundinkeri
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.