आजच्या ताणतणावाने भरलेल्या आयुष्यात आपल्या सर्वांना थोडा मोकळा वेळ हवा असतो. शांत वातावरणात बाहेर फिरणे, निसर्गाचा आनंद घेणे यात वेगळीच मज्जा असते. मग ते सुदंर समुद्रकिनारे असो कि ऐतिहासिक किल्ले. महाराष्ट्र सारख्या राज्यात फिरण्यासाठी विविध ठिकाण आहेत. महाराष्ट्राला लागलेला समुद्रकिनारा याचे सौंदर्य वेगळेच आहे. देशातल्या सर्वात मोठ्या जिल्हयाचे विभाजन करून पालघर जिल्हा अस्तित्वात आला. पालघर हा महाराष्ट्र राज्याचा ३६ वा जिल्हा आहे. या जिल्ह्यात फिरण्यासाठी अनेक समुद्रकिनारे, किल्ले ,गड आणि मंदिर आहेत. चला तर जाणून घेऊया हि ठिकाणे कोणती आहेत.
केळवा समुद्रकिनारा
केळवा समुद्रकिनारा हा केळवा किंवा केळवा बीच म्हणून ओळखला जातो. हा समुद्रकिनारा ८ किलोमीटर लांब आहे. केळवा किल्ल्यालगत असलेला हा समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. सुट्टींच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. विशेषतः शनिवारी आणि रविवारी जास्त गर्दी पाहायला मिळते. शांत आणि मोकळा असलेला हा समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो.
अर्नाळा समुद्रकिनारा
विरार रेल्वे स्थानकापासून ९ किलोमीटर दूर असलेला अर्नाळा समुद्रकिनारा एक आकर्षित पर्यटन ठिकाण आहे. समुद्रकिनाऱ्यावरच्या सुरुच्यां झाडांमुळे येथे थंड वातावरण असते. त्यामुळे पिकनिकसाठी ही एक उत्तम जागा आहे. येथील बहुतांश लोकसंख्या ही मासेमारी करणाऱ्या समाजाची आहे. या समुद्र किनाऱ्याजवळ रिसोर्ट देखील आहेत. जेथे तुम्ही शांतता आणि सुखद वातावरणाता आनंद घेऊ शकता.
डहाणू बोर्डी समुद्रकिनारा
डहाणू बोर्डी समुद्रकिनारा हा १७ किलोमीटर लांब आहे. हा किनारा पालघरच्या डहाणू तालुक्यात आहे. येथे जोरास्ट्रीयन समाजाचे पवित्र मंदिर,एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण आहे. येते असलेल्या मंदिरमध्ये हजारो वर्षापासून ज्योत जळत आहे. ज्याला पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. तसेच पारसी आणि इराणी समाजाची संस्कृती या ठिकाणी पाहायला मिळते.
जवाहर राजवाडा
जवाहर राजवाडा याला पालघरचे महाबळेश्वर असे देखील म्हणतात. हे ठिकाण आपल्या थंड हवेच्या वातावरणासाठी ओळखले जाते. ही जागा अद्याप येवढी प्रसिद्ध नसल्यामुळे येथे कमी गर्दी पाहायला मिळते. येथे प्रमुख्याने आदिवासी वसाहत राहते. येथील शांतता आणि धबधबे हे पर्यटकांना आकर्षित करतात. तसेच जवाहर हे वार्ली पोटिंगसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
वसई किल्ला
वसई किल्याला बस्सेईन असेही म्हणतात. हा किल्ला तीनही बाजूने समुद्राने वेढलेला आहे. वसई किल्ला हा पोर्तुगीज साम्राज्याचा महत्वाचा भाग होता. त्या काळी हा पोर्तुगीजांचा मुख्यालय होते. १८१७ मद्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात होता.
गंभीरगड
गंभीरगड हे आपल्या नावाप्रमाणे आहे. हे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आहे.तसेच याला गुजरातची सीमा लागते. या किल्ल्यावर बहुतांश घनदाट वाढलेली झाडी आहेत.येथे एक देवीचे मंदिर देखील आहे. या किल्ल्यावरुन निसर्गाचे नयनरम्य रुप पाहता येते.
जीवदानी मंदिर
विरार येथे असलेले हे जीवदानी मंदिर जागृत देवस्थांनांपैकी एक आहे. हे मंदिर डोंगरावर असून तेथे पोहचण्यासाठी १३७५ पायऱ्या आहेत. १५० वर्ष जुने असलेल हे मंदिर लाखो भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. येथे शनिवारी आणि रविवारी जास्त गर्दी पाहायला मिळते.
महालक्षी मंदिर
हे महालक्षी मंदिर आदिवासी समाजाचे कुलदैवत आहे. येथे प्रत्येक वर्षी महालक्षी देवीची यात्रा काढली जाते. ही यात्रा १५ दिवसांची असते. या मंदिरात देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
Edited by: Priyanka Mundinkeri