

फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजे केवळ खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा वजन घटणे एवढ्यापुरता मर्यादित नसतो. अनेक वेळा या आजाराची चिन्हं छातीत न दिसता हात आणि पायांवर सर्वात आधी उमटतात. शरीरातील नखं, मनगट, घोटे, स्नायू आणि त्वचेतील बदल हे त्याचे प्रारंभिक संकेत असू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.
१. बोटांच्या नखांचा आकार बदलणे (Finger Clubbing)
बोटांच्या टोकांवर सूज येणे, नखं खाली वाकलेली दिसणे, नखांखालील कोन बदलणे आणि बोटांमध्ये उष्णता जाणवणे ही लक्षणं ‘फिंगर क्लबिंग’ म्हणून ओळखली जातात. ही स्थिती नॉन-स्मॉल सेल फुफ्फुसाच्या कॅन्सरशी संबंधित असू शकते.
२. मनगट आणि गुडघ्यांना वेदना किंवा सूज येणे
जर मनगट किंवा गुडघ्यांना सूज येऊन वेदना होत असतील आणि हातापायांच्या हाडांमध्ये दुखत असेल, तर ते ‘हायपरट्रॉफिक पल्मनरी ऑस्टिओआर्थ्रोपथी’चे लक्षण असू शकते. हे फुफ्फुसाच्या कॅन्सरशी निगडित दुर्मिळ पण महत्त्वाचं संकेत असतं.
३. हाताच्या हाडांना स्पर्शाने दुखणे
पायांच्या पोटऱ्या किंवा हाताच्या हाडांवर दुखणे किंवा जळजळ जाणवणे हे देखील ‘एचपीओए’मुळे होऊ शकते. एक्स-रे किंवा बोन स्कॅनमध्ये या भागात सूक्ष्म बदल दिसू शकतात, जे कॅन्सरचा इशारा देतात.
४. पाय सुजणे
एका पायात अचानक सूज येणे, उष्णता किंवा वेदना जाणवणे हे ‘डीप व्हेन थ्रॉम्बोसिस’चं लक्षण असू शकतं. फुफ्फुसाचा कॅन्सर शरीरातील रक्त गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढवतो. अशा वेळी त्वरित वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
५. मांडी आणि खांद्यांच्या स्नायूंमध्ये कमजोरी
सतत थकवा येणे, जिने चढताना किंवा खुर्चीतून उठताना त्रास होणे, हात उचलताना अडचण येणे ही लक्षणं ‘पॅरानेओप्लास्टिक मायोसिटिस’ची असू शकतात. या स्थितीत फुफ्फुसाचा कॅन्सर असण्याची शक्यता वाढते.
६. हातांवरील त्वचेतील बदल
हाताच्या सांध्यांवर लालसर डाग, हातांवर खवली येणे, डोळ्यांच्या पापण्यांवर जांभळट रंग किंवा सूर्यप्रकाशात पुरळ येणे ही सर्व लक्षणं डर्माटोमायोसिटिस मध्ये दिसतात. या आजारासोबत अनेक प्रौढांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर आढळतो. या सर्व लक्षणांचा संबंध फुफ्फुसाच्या कॅन्सरशी असू शकतो. त्यामुळे जर हात-पायांमध्ये अशा प्रकारचे अचानक बदल दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.