WhatsApp New Features: WhatsApp मध्ये मोठा बदल, 'हे' फिचर होणार अपडेट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Update: नव्या वर्षात WhatsApp मध्ये मोठे बदल होणार असून, १ जूनपासून GIF फिचर पूर्णपणे अपडेट होणार आहे. Tenor ऐवजी Klipy कंपनी सेवा देणार आहे.
WhatsApp new features
WhatsApp Updategoogle
Published On

सध्या WhatsApp हाच सगळ्यांचा महत्वाचा आणि आवश्यक पुरावा बनला आहे. याचा वापर खेड्यापाड्यापासून मोठ-मोठ्या व्यक्तींपर्यंत करोडोंच्या संख्येने होत असतो. तसेच युजर्सच्या गरजेनुसार यामध्ये सातत्याने बदल केले जातात. ज्याने प्रत्येकाला हव्या तश्या पद्धतीने याचा वापर करता येतो. पुढील लेखात आपण नव्या वर्षात WhatsAppमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल जाणून घेणार आहोत.

WhatsAppमध्ये तुम्हाला चॅटींग करता येते, व्हाइस कॉल, व्हिडीओ कॉल करता येतो. ग्रूप मिटींग करता येते. तसेच महत्वाचे प्रोजेक्ट आपण स्क्रीन शेअर करुन दाखवू शकतो. आता WhatsAppने सगळ्यांना आवडाऱ्या फिचर म्हणजेच GIFsमध्ये बदल करण्याचा विचार केला आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

WhatsApp new features
Bhakri VS Chapati: चपातीऐवजी भाकरी खाणं खरंच योग्य आहे का? जाणून घ्या सल्ला अन् शरीरावर होणारे परिणाम

GIFs पाठवणं सध्या तरुणाईचं आवडतं काम झालं आहे. आता यामध्ये GIFs पाठवण्यापासून ते डिस्प्ले होण्यापर्यंत सगळेच बदल होणार आहेत. हा बदल १ जूनपासून होणार आहे. GIF चा अर्थ म्हणजे ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मट असा असतो. यामध्ये स्टेटिक इमेज आणि शॉर्ट, लूपिंग आणि साउंडलेस अॅनिमेशन होतं. याने तयार केलेले इमेज लोक चॅटींगमध्ये वापरतात.

आतापर्यंत Tenor कंपनी व्हॉट्सअॅपला GIF बनवून देत होती. मात्र आता ही कंपनी त्यांची सेवा बंद करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप ला नवीन Klipy कंपनी यापुढे साथ देणार आहे. ही सुविधा जून महिन्यापर्यंत सुरु होणार आहे. मात्र ३० दिवस याची चाचणी होईल मग ते युजर्सपर्यंत पोहोचेल. यामध्ये GIFची जागा तीन कॉलममध्ये असणार आहे. जे सहज चॅट करताना दिसेल. या फिचरसाठी अनेक युजर्स उत्साही आहेत.

WhatsApp new features
Red Blood Cells Deficiency: शरीरात लाल पेशींची कमतरता, मग आताच डाएटमध्ये या 4 पदार्थांचा समावेश करा, थकवा जाईल पळून अन् रहाल फिट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com