Red Blood Cells Deficiency: शरीरात लाल पेशींची कमतरता, मग आताच डाएटमध्ये या 4 पदार्थांचा समावेश करा, थकवा जाईल पळून अन् रहाल फिट
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना आरामासाठी वेळच मिळत नाही. अशावेळेस अशक्तपणा थकवा जाणवतो. ही समस्या लोक खूप सामान्य असल्यासारखी लोक दुर्लक्षित करतात. पण याचं मुळ कारण हे फक्त कामाचा थकवा नाही तर तुमच्या शरीरातील लाल रक्ताच्या पेशींची कमतरता सुद्धा असू शकते.
कारण ही लक्षणे या कमतरतेशी मिळतीजूळती आहेत. असं तज्ज्ञ सांगतात. यावर वेळीच उपचार केले नाहीत तर भविष्यात अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पुढे आपण लाल रक्तवाढवण्यासाठी कोणते घरगुती उपचार केले पाहिजेत हे जाणून घेणार आहोत.
लाल रक्ताच्या पेशी कमी होण्याचा परिणाम (Causes of low RBC Count)
लाल रक्ताच्या पेशी या तुमच्या शरीरातल्या वेगवेगळ्या भागात रक्त पोहोचवण्याचं काम करतात. त्यासाठी तुम्ही काही महत्वाच्या पदार्थांचं सेवन करणं खूप आवश्यक असतं. कारण जेव्हा रक्ताची कमतरता निर्माण होते तेव्हा शरीर कोणतंही काम करण्यासाठी साथ देत नाहीत. अनेक अवयव निकामी होण्याच्या मार्गावर येतात. इतकच नाही तर तुम्हाला गंभीर आजारांना सुद्धा सामोरं जावं लागतं. त्यामध्ये अशक्तपणासोबत (Anaemia), थायरॉइड, रक्तस्त्राव, ब्लड कॅन्सर, केमीयोथेरपीचे दुष्परिणाम, आयरन, व्हिटॅमिन्सची कमतरता, गर्भधारणेत अडथळे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
लाल पेशी कशा वाढवायच्या? How to Increase Red Blood Cells Quickly?
लाल रक्ताच्या पेशी वाढवण्यासाठी आहारात डाळींबाचे सेवन करा. यामध्ये असणारे अॅंटीऑक्सिडंट्स तुम्हाला निरोगी राहण्यासाठाही मदत करतील. तसेच कॅल्शियम, आयरनची शरीरात कमी भासू देणार नाहीत.
खजूरसुद्धा तुम्ही दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देतात. तसेच मनुके आणि अंजीर रक्तातले हिमोग्लोबीन वाढवतात. त्यामुळे दिवसाला दोन-दोन ड्रायफ्रुट्स खाणं फायद्याचं ठरु शकतं.
बीटाचे सेवन हे अनेक समस्यांसाठी चांगल मानलं जातं. याने लाल रक्ताच्या पेशी वाढण्यात मदत होते. तसेच हिमोग्लोबीन, आयरन, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड वाढतं. याचा ज्यूस किमान १ भर नियमित सेवन करावा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

