Sakshi Sunil Jadhav
आपण रोज वापरत असलेलं टॉयलेट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. ही नावं फक्त भाषेचा भाग म्हणून नाही, तर त्या ठिकाणाची संस्कृती, सुविधा आणि शिष्टाचाराशी जोडलेली असतात. चला जाणून घेऊया, कुठल्या ठिकाणी टॉयलेटला नेमकं काय म्हणतात.
घरात वापरल्या जाणाऱ्या टॉयलेटला बाथरूम म्हणतात. कारण बऱ्याच घरांमध्ये आंघोळ आणि टॉयलेट एकाच ठिकाणी असतं.
ऑफिस किंवा कॉर्पोरेटमध्यला टॉयलेटला वॉशरूम असं म्हटलं जातं. हे नाव जास्त शिस्तीतलं आणि व्यावसायिक मानलं जातं.
मॉल, मल्टिप्लेक्स किंवा मोठ्या हॉटेलमध्ये टॉयलेटला रेस्टरूम म्हणतात. ग्राहकांना आरामदायी सुविधा मिळाव्यात हा याचा अर्थ असतो.
विमानात असलेल्या टॉयलेटसाठी लॅव्हेटरी (Lavatory)हा आंतरराष्ट्रीय शब्द वापरला जातो.
उच्च दर्जाच्या रेस्टॉरेंटमध्ये टॉयलेटला पावडर रूम (Powder Room)असं म्हटलं जातं. विशेषतः महिलांसाठी हा शब्द वापरला जातो.
रेल्वे स्टेशन, बस स्टँड याठिकाणी टॉयलेटला पब्लिक कन्व्हिनियन्स असं म्हणतात. हे सर्वसामान्यांसाठी नेहमीच खुलं असतं.
स्टेडियम किंवा मोठ्या सार्वजनिक ठिकाणी पर्सनल विभाग असलेल्या टॉयलेटला टॉयलेट क्युबिकल म्हटलं जातं.
देश, संस्कृती आणि ठिकाणानुसार टॉयलेटसाठी वापरली जाणारी नावे बदलतात. मात्र स्वच्छता आणि सुविधा हा यामागचा मुख्य उद्देश असतो.