Vitamin B Deficiency: सतत थकवा, चक्कर येतेय? Vitamin Bची असू शकते कमी, वेळीच ओळखा संपूर्ण लक्षणं

Vitamin B12 Symptoms: शरीरातील सतत थकवा, चक्कर, चिडचिड आणि हात-पाय सुन्न होणे ही व्हिटॅमिन बी कमतरतेची लक्षणे असू शकतात. वेळेत ओळखणं आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
vitamin b12 symptoms
vitamin b deficiency saam tv
Published On

आपण रोजच्या धावपळीत थकवा, चक्कर येणे किंवा सतत चिडचिड होणे याकडे दुर्लक्ष करतो. पण ही लक्षणं फक्त ताणतणावाची नसून Vitamin B च्या कमतरतेमुळेही असू शकतात. Vitamin B शरीरातील ऊर्जा, मेंदू आणि नर्व्हस सिस्टिमसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याची कमतरता वेळेत ओळखणं गरजेचं आहे. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

Vitamin Bच्या कमीची लक्षणे कोणती?

1. सतत थकवा आणि कमजोरी जाणवणे.

पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवत असेल तर सावध व्हा. कारण Vitamin Bच्या कमीची ही लक्षणे असू शकतात. Vitamin B12 ऊर्जा निर्माण प्रक्रियेत मदत करते. त्याची कमतरता असेल शरीर लवकर थकतं आणि कमजोरी वाढते.

2. त्वचा फिकट किंवा पिवळसर दिसणं.

अचानक चेहऱ्यावरचे तेज कमी होणे आणि त्वचा फिकट दिसणे. हे लक्षण व्हिटॅमिन्सची कमीचे असू शकते. Vitamin B12 कमी झाल्याने रक्तातल्या लाल पेशी कमी होतात. यामुळे अ‍ॅनिमिया होऊन श्वास घेताना त्रास होऊ शकतो.

vitamin b12 symptoms
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीचा हफ्ता आला नाही? मग या गोष्टी लगेचच तपासा

3. हात-पाय सुन्न होणे.

हात-पायांमध्ये मुंग्या किंवा सुन्नपणा जाणवत असेल तर शरीरात व्हिटॅमिन्सची कमी आहे. Vitamin B12 नर्व्हसाठी महत्वाचं असतं. कमतरतेमुळे नर्व्ह डॅमेज होऊन ही लक्षणं दिसतात.

4. चिडचिड किंवा नैराश्य.

कारण नसताना चिडचिड किंवा उदास वाटत असेल तर व्हिटॅमिनच्या कमीचा हा परिणाम समजावा. Vitamin B6, B12 आणि फोलेट मेंदूतील रसायनांसाठी आवश्यक असतो. याच्या कमतरतेमुळे नैराश्य आणि मानसिक अस्वस्थता वाढते.

तज्ज्ञांचा सल्ला

वरील सगळी लक्षणं जास्त दिवस दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्ततपासणी करून Vitamin B ची पातळी तपासणंही महत्त्वाचं आहे. योग्य आहार आणि सप्लिमेंट्समुळे ही कमतरता भरून काढता येऊ शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

vitamin b12 symptoms
Food Safety: उरलेले पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणं सोडा, अन्यथा होईल शरीरावर घातक परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com