Sakshi Sunil Jadhav
उरलेलं जेवण जास्त वेळ टिकावं म्हणून सगळेच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतात. पण प्रत्येक पदार्थासाठी फ्रिज योग्य नसतो. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
शिजलेला भात फ्रिजमध्ये ठेवल्यावर त्याचे नैसर्गिक उष्ण गुणधर्म कमी होतात. भात जड, चिकट आणि पचायला कठीण होतो. चुकीच्या साठवणीमुळे पोटदुखी किंवा अन्न विषबाधेचा धोका वाढतो.
चमचा किंवा हात घातलेले दही फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवू नये. त्याने दही लवकर खराब होतं आणि त्यातीले प्रोबायोटिक गुणधर्म कमी होतात. जंतुसंसर्गाचा धोका सुद्धा वाढतो.
कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यावर त्यातला ओलावा वाढतो, तो मऊ पडतो आणि लवकर सडतो. त्यामुळे कांद्याची चव आणि पोषणमूल्यही कमी होतात.
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यावर त्याची साल सुरकुततात आणि गर मऊ होतो. यामुळे नैसर्गिक चव निघून जाते.
मध कधीच फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रिजच्या थंड तापमानामुळे मधाचं पोषणमूल्यही कमी होतं. मध नैसर्गिकरित्या खराब होत नाही, त्यामुळे तो बाहेरच ठेवा.
शिजवलेल्या भाज्या, उसळ किंवा परतलेले पदार्थ जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवू नका. हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. दोन दिवसांपेक्षा जास्त साठवू नका.
चटणी किंवा वाटण फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात बुरशी निर्माण होण्याचा धोका असतो. शक्यतो ताजी चटणी बनवून लगेच खा.
कोणताही प्रक्रिया झालेला पदार्थ फोडणी दिलेला, परतलेला भात जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवू नका. अशा पदार्थांमुळे अपचन व गॅसची समस्या होऊ शकते.