Budget 2026: सोने-चांदीचे दर स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

Budget 2026 Gold Price Fall: अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सोने-चांदीचे दर कमी होण्याबाबत अर्थसंकल्पात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Budget 2026
Budget 2026Saam tv
Published On
Summary

सोन्याच्या दरात कपात होणार?

अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

सोन्याचे दर कमी होण्यामागची कारणे

सध्या सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या दराने १,६०,००० रुपयांचा टप्पा पार केला आहे. सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ५ हजार डॉलर्स तर चांदी १०० डॉलर्स आहेत. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. दरम्यान, आता अर्थसंकल्पात सोन्याच्या दराबाबत काही निर्णय होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Budget 2026
Budget 2026: करदात्यांना पुन्हा दिलासा मिळणार! अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गीयांना काय अपेक्षा? वाचा सविस्तर

१ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी दिलासादायक निर्णय होण्याची शक्यता आहे. यामध्ये सोन्यावरील आयात शुल्क कमी होणार का जीएसटीमध्येही सवलत मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

आयात शुल्कात कपात

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान, घरगुती व्यापाराला चालना देण्यासाठी शुल्कात चांगली सरलता आणणे गरजे आहे. यामुळे दागिने स्वस्त होतील. परिणामी रोजगाराला गती मिळणार आहे. त्यामुळे आयात शुल्क कमी झाले तर सर्वांना फायदा होणार आहे.

जीएसटीत सवलत

सध्या दागिन्यांवर ३ टक्के जीएसटी आहे. हा दर १.२५ ते १.५ टक्के करण्याची मागणी केली जात आहे. जर अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली तर ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

Budget 2026
Budget Friendly Plan: सणासुदीचा भन्नाट प्लॅन, फक्त १ रुपयात मिळवा दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग

सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड

सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड ही योजनाबंद करण्यात आली आहे. ही योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी होत आहे. यामुळे नागरिक पुन्हा एकदा सोन्याच्या गुंतवणूकीकडे वळू शकतात. यामध्ये व्याज आणि टॅक्स फायदा मिळत होता.

डिजिटल गोल्ड

सोने अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी डिजिटल गोल्डला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळणार आहे.

कर रचना

कर रचनेत नेहमी बदल होताना दिसत आहेत. यातील नियमात बदल झाले की किंमती वाढतात. यामुळे कर रचनेच स्थिरता असायला हवी. यामुळे दागिने जास्त प्रमाणात खरेदी केले जाऊ शकतात.

Budget 2026
Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे २४,५०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com