Gold-Silver Price: सोन्यानंतर चांदीही चमकली; जाणून घ्या दिवसाअखेरचा सोने-चांदीचा दर

Gold-Silver Price : आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत आणखी वाढ झाली. नवीन सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये साधरण वाढ होईल, असं वाटत होतं. परंतु त्यांच्या किमतीनं जोर पकडलाय.
Gold-Silver Price :
Gold and silver displayed at a bullion shop as prices touch record highs in the Delhi Sarafa market.saam tv
Published On
Summary
  • सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ

  • चांदी पहिल्यांदाच 3 लाखांच्या पुढे

  • सोने प्रति 10 ग्रॅम 1.48 लाखांवर

वर्ष २०२६ लागलं तरी सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी वाढीला ब्रेक लागत नाहीये. बुलेट ट्रेनच्या वेगाने किमतींमध्ये वाढ होतेय. वेगाने बदलणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होतेय. यामुळे त्यांच्या किमतीही रॉकेटच्या वेगाने वाढत आहेत. सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत आणखी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोने आणि चांदीच्या दरांनी नवीन विक्रम प्रस्थापित केलाय.

चांदी पहिल्यांदाच ३ लाख रुपयांच्या पुढे

दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर प्रति किलोग्रॅम ३०२,६०० रुपयांपर्यंत वाढले, तर सोनेही प्रति १० ग्रॅम १.४८ लाखांवर पोहोचले आहे. यासह सोने आणि चांदीच्या किमती आज दिवसाअखेर पुन्हा एकदा नवीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. सोमवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किमती १०,००० रुपयांनी वाढून ३,०२,६०० रुपये प्रति किलोवर पोहोचल्या आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी, दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर २,९२,६०० प्रति किलोग्रॅमवर ​​होते, त्यावेळी बाजार बंद झाला होता.

Gold-Silver Price :
Income Tax Refund Delay: ITR च्या रिफंडसाठी एक वर्षापर्यंत पाहावी लागेल वाट, काय आहे कारण? परतफेडीवर व्याज मिळेल का?

देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत मागणी वाढत असल्यानं चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. जागतिक आर्थिक मंदीसह सोने आणि चांदीच्या मागणीत सतत वाढ होत आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे आणि गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तेकडे अधिकाधिक वळत आहेत. त्याचमुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत मोठी वाढ होतेय.

Gold-Silver Price :
EPFO मध्ये मोठा बदल; पाच वर्ष असो की १०वर्ष झटक्यात मिळेल जुना PF नंबर; जाणून घ्या प्रोसेस

सोमवारी दिल्लीच्या बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव प्रति १०ग्रॅम १,९०० रुपयांनी वाढून १.४८ लाख रुपये झाला. गेल्या आठवड्यात, शुक्रवारी ९९.९ टक्के शुद्ध सोने प्रति ग्रॅम १,४६,२०० रुपयांवर ​​बंद झाले होते. या वर्षाच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमतीत थोडीशी वाढ होईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. पण प्रत्यक्षात त्यांच्या किमती तज्ञांनी भाकीत केलेल्या अंदाजापेक्षा खूप वेगाने वाढू लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com