HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची अपडेट! आजच करा 'हे' काम नाही तर १ जुलैपासून भरावा लागेल दंड

HSRP Number Plate Rules Update News : महाराष्ट्रातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसविणे ३० जून २०२६ पर्यंत बंधनकारक करण्यात आले आहे.
HSRP NUMBER PLATE DEADLINE ENDS JUNE 30; FINES AND RTO RESTRICTIONS FROM JULY 1 IN MAHARASHTRA
HSRP NUMBER PLATE DEADLINE ENDS JUNE 30; FINES AND RTO RESTRICTIONS FROM JULY 1 IN MAHARASHTRASaam Tv
Published On
Summary
  • १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक

  • HSRP बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६

  • १ जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनधारकांना RTO सेवा मिळणार नाहीत

वाहनचालकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. १ जुलैपूर्वी तुम्ही एक काम केलं नाहीत तर तुम्हाला कारवाईला सामोर जावं लागू शकतं. कारण राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविणे आता बंधनकारक करण्यात आले असून, त्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांवर १ जुलैपासून मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, HSRP नंबर प्लेट बसवल्यास वाहन चोरी, बनावट नंबर प्लेटचा वापर तसेच गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांना केवळ दंडालाच सामोरे जावे लागणार नाही, तर आरटीओमधील आरसी ट्रान्सफर , पत्ता अपडेट करणे , हायपोथेशीयन टर्मिनेशन , री - रजिस्ट्रेशन , यांसारखी कामे HSRP शिवाय करता येणार नाहीत.

HSRP NUMBER PLATE DEADLINE ENDS JUNE 30; FINES AND RTO RESTRICTIONS FROM JULY 1 IN MAHARASHTRA
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

दरम्यान, ३० जूनपूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून HSRP बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना काहीसा दिलासा देण्यात आला आहे. अशा वाहनधारकांवर अपॉइंटमेंटच्या तारखेपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार नसल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे. राज्यात HSRP बसविण्याच्या प्रक्रियेसाठी तीन स्वतंत्र झोन तयार करण्यात आले आहेत. झोन १ साठी रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, झोन २ साठी रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि झोन ३ साठी एफटीए HSRP सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

HSRP NUMBER PLATE DEADLINE ENDS JUNE 30; FINES AND RTO RESTRICTIONS FROM JULY 1 IN MAHARASHTRA
Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार दुचाकी वाहनांसाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये, तर हलकी मोटार वाहने तसेच मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कामध्ये फिटमेंटचा खर्च समाविष्ट असून जीएसटी अतिरिक्त आकारला जाणार आहे. परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी सर्व वाहनधारकांनी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी वेळेत HSRP नंबर प्लेट बसवून नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com