HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! HSRP नंबरप्लेट बसवा, अन्यथा दररोज ₹१००० दंड

HSRP Number Plate Penalty: एचएसआपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. जर ही नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने ही नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे.
HSRP Number Plate
HSRP Number PlateSaam Tv
Published On
Summary

सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य

नंबरप्लेट न बसवल्यास दंड

HSRP नंबरप्लेटसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा

राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना ही नंबरप्लेट बसवायची आहे. त्यानंतरच्या वाहनांना ही नंबरप्लेट आधीच बसवलेली आहे. दरम्यान, आता एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची मुदत संपली आहे. ही मूदत ३१ डिसेंबरपर्यंतच होती.

HSRP Number Plate
HSRP Number Plate: अजूनही वेळ गेलेली नाही, एचएसआरपी नंबर प्लेट बसवा; अन्यथा ₹१०००० दंड भरावाच लागणार, वाचा

एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची मुदत संपली असली तरीही लाखो वाहनधारकांनी हे काम अजूनही केले नाही. सोलापूरातील दहा लाखांपैकी फक्त पावणेतीन लाख वाहनधारकांनी हे काम केले आहे. दरम्यान, आता नंबरप्लेट न बसवल्यास दंड भरावा लागणार आहे.

राज्यात तब्बल ३५ लाख वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवलेली नाही. दरम्यान, आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे.

नंबरप्लेटसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन

वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य होते.यासाठी ऑनलाइन वेबसाइट सुरु करण्यात आली आहे. ज्या वाहनांनी अजूनही रजिस्ट्रेशन केले नाही त्यांनी तिथे रजिस्ट्रेशन करावे, असं परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला ही नंबरप्लेट तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर ही नंबरप्लेट लावायची आहे. ही नंबरप्लेट सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

HSRP Number Plate
HSRP Number Plate: HSRP नंबरप्लेट बसवली नाही, डेडलाइन संपली, आता काय कारवाई होणार? वाचा सविस्तर

दंड किती भरावा लागणार?

एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास तुम्हाला १००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. यानंतर दुसऱ्यावेळी ही रक्कम तिप्पट, पाचपट होऊ शकते. त्यामुळे नंबरप्लेट बदलून घ्यावी, असं सांगितलं आहे. या वाहनांवर कारवाई कधीपासून होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच वाहतूक, आरटीओ आणि महामार्ग पोलिस यावर कारवाई सुरु करु शकतात.

HSRP Number Plate
HSRP Number Plate: वाहनचालकांना झटका! HSRP नंबरप्लेट बसवली नाही 'या' तारखेपासून कारवाई होणार; किती दंड भरावा लागणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com