HSRP Number Plate: अजूनही वेळ गेलेली नाही, एचएसआरपी नंबर प्लेट बसवा; अन्यथा ₹१०००० दंड भरावाच लागणार, वाचा

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे.तोपर्यंत सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावी.
HSRP Number Plate
HSRP Number PlateSaam Tv
Published On

राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने नंबर प्लेट बसवू शकतात. दरम्यान, आतापर्यंत अनेकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवली आहे. अनेक वाहनांना अजूनही नंबर प्लेट बसवलेली नाही. दरम्यान, ज्यांनी अजून ही नंबरप्लेट बसवली नाही त्यांना लवकरात लवकर हे काम करावे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल.

HSRP Number Plate
SRA Scheme: एसआरए इमारतीत राहताय? ही बातमी तुमच्यासाठीच, सरकारने घेतला मोठा निर्णय

एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. तुम्ही पुढच्या एका महिन्यात नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. मुंबई पुण्यासह राज्यातील लाखो वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवली आहे. जर तुम्ही नंबरप्लेट लावली नाही तर तुम्हाला १० हजारांचा दंड द्यावा लागेल.

HSRP Number Plate
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १५ ऑगस्टपूर्वी हे काम कराच, अन्यथा बसेल ₹१०,००० दंड

राज्यातील जवळपास ६० टक्के वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यात आली आहे. मुंबईत ६६ टक्के वाहनांना ही नंबर प्लेट बसवली आहे.दरम्यान, एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यात पुणे आरटीओ नंबर १ ला आहे. पुण्यात सर्वाधिक वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यात आली आहे. मुंबईत अंधेरी आरटीओत सर्वाधिक वाहनांना नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. अजूनपर्यंत ज्यांनी हे काम केले नाही त्यांनी लवकरात लवकर करावे.

एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची प्रोसेस (HSRP Number Plate Registration Online Process)

तुम्हाला सर्वात आधी transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर Apply High Security Registration Plate Online या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर ऑर्डर एचएसआरपी यावर क्लिक करा. यानंतर तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर आणि इंजिन नंबर टाका.

यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येईल. तुम्हाला शुल्क भरायचे आहेत.

यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळणार आहे. यानंतर तुम्ही जवळच्या एजन्सीत अपॉइंटमेंट बुक करा.

यानंतर दिलेल्या तारखेला जाऊन नंबरप्लेट बदलून घ्यायची आहे.

HSRP Number Plate
HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com