SRA Scheme: एसआरए इमारतीत राहताय? ही बातमी तुमच्यासाठीच, सरकारने घेतला मोठा निर्णय

Government Decision on SRA Buildings Scheme: झोपडपट्टी पुनर्विकास योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एसएआर इमारत बांधण्यासाठी ६५ टक्के जागा वापरता येणार आहे. उर्वरित ३५ टक्के जागा ही महानगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरणाकडे सुपूर्द करावी लागणार आहे.
SRA Scheme
SRA SchemeSaam Tv
Published On
Summary

एसआरए इमारतीबाबत महत्त्वाचा निर्णय

आता तुम्हाला फक्त ६५ टक्के जागेवर इमारत बांधता येणार

३५ टक्के जागा खुली ठेवावी लागणार

महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या या योजनेत ६५ टक्के जागेवर तुम्हाला इमारत बांधता येणार आहे. एसआरए प्रकल्पात आता ३५ टक्के जागा खुली ठेवावी लागणार आहे. ही जागा तुम्हाला विकसित करुन महानगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी लागणार आहे. या जागेवर महानगरपालिकेवर किंवा स्थानिक प्राधिकरणाचा हक्का असणार आहे.

SRA Scheme
Mumbai News : मुंबईत SRA प्राधिकरणाची विशेष मोहीम; हजारो झोपडीधारकांना झाला लाखमोलाचा फायदा, वाचा सविस्तर

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाचे परिपत्रक जारी करण्यात आली आहे. यामधील ३५ टक्के जागा सार्वजनिक स्वरुपात खुली ठेवावी लागणार आहे. ६५ टक्के जागेतच इमारतींचा विकास करता येणार आहे.

खुल्या जागेच्या अंमलबजावणीसाठी एक विशेष निरीक्षण समितीची स्थापना करण्यात येणार आहे. एसआर उपमुख्य अभियंतांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती सर्व बाबींचे परिक्षण करणार आहे.

SRA Scheme
SRA Houses Mumbai: SRA ची घरं विकता येणार नाहीत; उच्च न्यायालयाचे महत्वाचे आदेश

आदेशात काय म्हटलंय?

- झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात आता ३५ टक्के जागा खुली ठेवावी लागणार आहे

- ही ३५ टक्के जागा विकसित करून स्थानिक महापालिका किंवा प्राधिकरणाकडे सुपूर्द करावी लागेल

- तीन वर्षांसाठी या जागेच्या देखभालीची तरतूद ही विकासकालाच करावी लागेल

- विकसित केलेल्या या ३५ टक्के जागेमध्ये सर्व नागरिकांना प्रवेश खुला ठेवावा लागेल

- या खुल्या जागी हरित लँडस्केपिंग, उद्यान, सावलीसाठी झाडे, जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बाकडे, खेळणी या स्वरूपात विकसित केल्या जातील

- "ही जागा सार्वजनिक आहे" अशा आशयाचा फलकही विकसित केलेल्या खुल्या जागेत लावावा लागेल

-झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने प्रत्येक ६ महिन्यांनी प्रतिज्ञापत्रक दाखल करावे लागेल. यामध्ये ३५ टक्के खुल्या जागेचा विकास आणि हस्तांतरण स्थितीबाबत माहिती द्यावी लागेल.

SRA Scheme
Government Scheme: शेतकर्‍यांसाठी सरकारची आणखी एक योजना; ३० हजार रुपयांची मदत देणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com