HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

HSRP Number Plates: महाराष्ट्र सरकारने HSRP नंबरप्लेटसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. HSRP नंबरप्लेट लावण्यासाठीची मुदतवाढ ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.
HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम
HSRP Number Plates Saam Tv
Published On

Summary -

  • महाराष्ट्र सरकारने HSRP नंबरप्लेट बसवण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली.

  • १ डिसेंबरपासून HSRP नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाई होणार.

  • पुनर्नोंदणी, परवाना नूतनीकरण यांसारख्या सेवा HSRP शिवाय थांबवण्यात येणार.

  • वाहनधारकांना अंतिम मुदतीपूर्वी HSRP बसवण्याचे आवाहन.

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवण्यासाठी अंतिम मुदतवाढ दिली आहे. HSRP नंबरप्लेट बसवण्याची सुरूवातीची मुदत ३१ मार्च २०२५ होती. त्यानंतर मुदतवाढ करत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत संधी देण्यात आली होती. आता पुन्हा मुदत वाढ करत HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठीची मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत HSRP नंबरप्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रलंबित स्थापना, नियुक्ती उपलब्धतेतील विलंब, ग्रामीण फिटमेंट केंद्रे उशिरा उघडणे, काही केंद्रे बंद होणे, नागरिकांच्या जोरदार मागण्या यासह अनेक घटकांचा विचार केल्यानंतर परिवहन विभागाने मुदतवाढीबाबतचा हा निर्णय घेतला आहे.

राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, '१ डिसेंबर २०२५ पासून विशेष अंमलबजावणी पथके ज्या वाहनांवर अद्याप एचएसआरपी नाही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करतील. ज्या वाहन मालकांनी ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी नियोजित अपॉइंटमेंट निश्चित केली आहे, त्यांना त्यांच्या फिटमेंट तारखेपर्यंत कारवाईतून सूट असेल."

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम
HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा सविस्तर

परिवहन विभागाच्या आदेशानुसार, एचएसआरपी नसलेल्या वाहनांसाठी विद्यमान निर्बंधांनाही अधिक बळकटी देण्यात आली आहे. एचएसआरपी नसलेल्या वाहनांच्या मालकांना मालकी हस्तांतरण आणि गहाणखत बदल यासारख्या सेवांपासून आधीच बंदी आहे. डिसेंबरपासून, पुनर्नोंदणी, वाहन सुधारणा मंजुरी आणि परवाना नूतनीकरण यासारख्या अतिरिक्त सेवा एचएसआरपी बसवल्याशिवाय थांबवल्या जातील. तपासणीदरम्यान ताब्यात घेतलेली वाहने एचएसआरपी प्लेट असल्याशिवाय सोडली जाणार नाहीत.

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १५ ऑगस्टपूर्वी हे काम कराच, अन्यथा बसेल ₹१०,००० दंड

'परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात व्यापक जागरूकता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक वाहन विक्रेते, ऑटो-रिक्षा, टॅक्सी आणि बस संघटनांना बैठकींद्वारे माहिती दिली जात आहे. जेणेकरून कोणत्याही वाहन मालकाला अंतिम मुदतीची माहिती मिळेल. दंड आणि सेवा निर्बंध टाळण्यासाठी नागरिकांना अंतिम मुदतीपूर्वी HSRP बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.' असे भीमनवार यांनी सांगितले. HSRP शी संबंधित तक्रारी विभागाच्या अधिकृत ईमेल dytccomp.tpt-mh@gov.in वर पाठवता येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम
मोठी बातमी! HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठीची मुदत पुन्हा वाढवली! शेवटचा दिवस कोणता?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com