मोठी बातमी! HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठीची मुदत पुन्हा वाढवली! शेवटचा दिवस कोणता?

HSRP Number Plate : राज्यातील लाखो वाहनमालकांना दिलासा मिळाला आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
HSRP Number Plate
HSRP Number Platex
Published On
Summary
  1. महाराष्ट्र सरकारने एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठीची अंतिम तारीख वाढवली.

  2. १ डिसेंबर २०२५ नंतर प्लेट न बसविल्यास दंडात्मक कारवाई होणार.

  3. वाहनमालकांनी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी.

HSRP : १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच एचएसआरपी प्लेट वाहनांवर बसवण्याबाबत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जुन्या वाहनांना उद्या (१५ ऑगस्ट) पर्यंत एचएसआरपी नंबर बसवण्याची मुदत देण्यात आली होती. आता एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

एचएसआरपी नंबरसाठी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन वाहन मालकांनी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. १ डिसेंबर २०२५ नंतर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. ३० नोव्हेंबरपर्यंत अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांवर कारवाई होणार नाही, अशी माहिती सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिली आहे.

HSRP Number Plate
Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

राज्य सरकारने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ ची मुदतवाढ दिली होती. मात्र अनेक वाहनमालकांनी ही नंबर प्लेट बसवून घेतली नव्हती. मुदत संपायला एक दिवस बाकी असताना सरकारने पुन्हा एकदा मुदत वाढून दिली आहे. आता ३० नोव्हेंबर पर्यंत वाहनमालकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

HSRP Number Plate
Shocking : २ वर्षांपूर्वी भरती; भाईंदरमध्ये नेमणूक, अवघ्या २४ वर्षांच्या पोलिसानं मृत्यूला कवटाळलं

HSRP नंबर प्लेट मिळवण्यासाठी काय करावे?

  • http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा.

  • Apply High Security Registration Plate Online यावर क्लिक करा.

  • Order HSRP असे टाकल्यानंतर वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, इंजिन नंबर, चेसीस नंबर आणि मोबाईल नंबर टाका.

  • स्क्रीनवर पेमेंटचा ऑप्शन दिसेल, वाहनाच्या अनुसार शुल्क करा.

  • पेमेंट केल्यानंतर रिसिप्ट मिळेल. त्यानंतर जवळच्या एजन्सीत अपॉइंटमेंट बुक होईल.

  • अपॉइंटमेंट असलेल्या तारखेला एजन्सीमध्ये जाऊन नंबर प्लेट घ्या.

HSRP Number Plate
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैनिकांना सन्मान, १६ बीएसएफ जवांनाना शौर्य पुरस्कार प्रदान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com