Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended: लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता ईकेवायसीसाठी मुदत वाढवून मिळण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी

लाडक्या बहिणींना ईकेवायसीसाठी संधी मिळणार?

लाडक्या बहिणींना १ महिन्याची मुदत वाढवून मिळण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे केवायसी करण्यासाठी आता शेवटची संधी उरली आहे. लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीत दुरुस्ती करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. दरम्यान, जर केवायसी केली नाही तर महिलांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. दरम्यान, आता लाडक्या बहि‍णींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवल जात आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत ज्या महिलांनी केवायसी केले नाही त्यांना संधी मिळू शकते.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: महिना संपायला उरले शेवटचे ३ दिवस! लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचे ₹३००० कधी येणार? वाचा अपडेट

केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार (Ladki Bahin Yojana eKYC Deadline May Extended)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची संधी ३१ डिसेंबर होती. दरम्यान तोपर्यंत लाखो महिलांनी केवायसी केलेली नाही. त्यामुळे महिलांचे लाभ बंद झाले आहेत. आता या महिलांना केवायसी करण्याची पुन्हा एकदा संधी मिळू शकते. लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करण्यासाठी अनेक महिलांनी दुर्लक्ष केले. परिणामी त्यांचा लाभ बंद करण्यात आला. परंतु आता या महिलांचा लाभ पुन्हा सुरु होऊ शकतो. महिलांना जर केवायसी करण्याची संधी मिळाली तर त्या पुन्हा केवायसी करु शकतात.

सोलापूरातील एकूण ११ लाख ५६३ महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. त्यातील दीड लाख महिलांनी केवायसी केलीच नाही. राज्यातील जवळपास १७ लाख महिलांची केवायसी बाकी आहे. दरम्यान, आता केवायसीची संधी न देता १७ लाख महिलांचा लाभ बंद करणे हे सरकारला परवडणारे नाही, त्यामुळे महिलांना एक संधी मिळू शकते. असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत सकाळने वृत्त दिले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: शेवटचे ४८ तास! लाडक्या बहिणींनो आजच हे काम करा अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार

केवायसीत दुरुस्तीची आज शेवटची तारीख (Ladki Bahin Yojana eKYC Mistake Error Deadline Today)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना अनेक महिलांना प्रश्न समजले नाही त्यामुळे त्यांनी चुकीची उत्तरे दिली. यामुळे महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. आता याच महिलांना केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. ही मुदत ३१ मार्चपर्यंतच होती. मात्र, ही मुदत वाढवून ३० एप्रिल करण्यात आली. म्हणजेच केवायसीतील दुरुस्तीसाठी आजच शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर हे काम करा.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कधीही येऊ शकतात ₹३०००; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com