Ladki Bahin Yojana: शेवटचे ४८ तास! लाडक्या बहिणींनो आजच हे काम करा अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार

Ladki Bahin Yojana eKYC Deadline: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे केवायसी करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींकडे उरले शेवटचे ४८ तास

लवकरात लवकर केवायसी करा

केवायसी केल्याशिवाय मिळणार नाही योजनेचा लाभ

महाराष्ट्र सरकारने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती.या योजनेचे सुरुवातीला जवळपास अडीच कोटी लाभार्थी होते. यानंतर महिलांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद केला. दरम्यान, निकषांसोबतच ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचाही लाभ कायमचा बंद करण्यात आला आहे. महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, ज्यांनी केवायसीत चुका केल्या आहेत त्यांच्याकडे चुक सुधारण्याची शेवटची संधी आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ३० एप्रिलनंतर या महिलांचे ₹१५०० कायमचे बंद; तुमचंही नाव आहे का?

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली. दरम्यान, केवायसीदरम्यान अनेकांनी चुका केल्याचे लक्षात आहे. महिलांना प्रश्न व्यवस्थित समजला नसल्याने त्यांनी चुकीची उत्तरे दिली. अशा महिलांसाठी आता केवायसीमध्ये दुरुस्तीसाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत तुम्हाला केवायसीमध्ये दुरुस्ती करायची आहे.

लाडक्या बहि‍णींकडे शेवटचे ४८ तास (Ladki Bahin Yojana eKYC Deadline)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे शेवटचे ४८ तास उरले आहेत. या कालावधीत महिलांनी केवायसीत दुरुस्ती करायची आहे. जर केवायसीत दुरुस्ती केली नाही तर त्यांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली आहे त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. महिलांनी लवकरात लवकर केवायसी करावी.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

केवायसीनंतर महिलांचा लाभ होणार बंद

लाडकी बहीण योजनेत केवायसीनंतरदेखील अनेक महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक महिलांनी निकषात न बसतानाही योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांची सर्व माहिती केवायसीच्या पडताळणीत उघड होणार आहे. त्यानंतर अशा महिलांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. त्यामुळे निकषात बसणाऱ्या महिलांनाच केवायसी केल्यावर लाभ मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: महिना संपायला उरले शेवटचे ३ दिवस! लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचे ₹३००० कधी येणार? वाचा अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com