Ladki Bahin Yojana: महिना संपायला उरले शेवटचे ३ दिवस! लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचे ₹३००० कधी येणार? वाचा अपडेट

Ladki Bahin Yojana March-April Installment Date: लाडकी बहीण योजनेत महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. महिलांच्या खात्यात कधीही पैसे जमा होऊ शकतात.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?

या दिवशी खात्यात येऊ शकतात पैसे

लाडक्या बहिणींना या महिन्यात किती पैसे मिळणार?

एप्रिल महिना संपत आला आहे तरीही लाडक्या बहि‍णींच्या खात्यात मार्चचा हप्ता जमा झालेला नाही. मागच्या महिन्याचाच हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, त्यानंतर एप्रिलचा हप्तादेखील कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याचीही चर्चा सुरु आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ३० एप्रिलनंतर या महिलांचे ₹१५०० कायमचे बंद; तुमचंही नाव आहे का?

लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana March April Installment Date)

लाडकी बहीण योजनेत गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ता लांबणीवर जात आहे. हप्ता नेहमी एक महिना उशिरा दिला जातो. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे येतात. दरम्यान, आतादेखील महिनाअखेरीस महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. महिलांना या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एप्रिल महिना संपायला अवघे ३ दिवस उरले आहेत. त्यामुळे या कालावधीत कधीही पैसे दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महिलांना एका महिन्याचे की दोन महिन्याचे पैसे दिले जाणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: टेन्शन वाढवणारी बातमी, दीड लाख लाडकींचे १५०० रुपये कायमचे होणार बंद, महत्वाची अपडेट आली समोर

लाडक्या बहि‍णींना किती पैसे मिळणार? (Ladki Bahin Yojana Installment Update)

लाडकी बहीण योजनेत महिलांना या महिन्यात किती पैसे मिळणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे या महिन्यात फक्त एकाच महिन्याचे १५०० रुपये की दोन महिन्याचे ३००० रुपये मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! २६ लाख लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता; तुम्हाला मिळणार की नाही?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com