Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! २६ लाख लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता; तुम्हाला मिळणार की नाही?

Ladki Bahin Yojana 26 Lakh Women Not do eKYC: लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी अवघे ४ दिवस उरले आहेत. लाडकी बहीण योजनेत जवळपास २६ लाख महिलांनी केवायसी केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

२६ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार

लाखो महिलांनी केवायसी केलीच नाही

एप्रिलनंतर मिळणार नाही ₹१५००

लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाइन ईकेवायसीसाठी अवघे ४ दिवस उरले आहेत. लाडक्या बहि‍णींना ईकेवायसी करण्यास सांगितले आहे. ज्या महिला केवायसी करणार नाही त्यांचा लाभ कायमचा बंद केला जाईल. या महिलांना यापुढे कधीच पैसे मिळणार नाहीत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत तब्बल २६ लाख ३४ हजार महिलांनी केवायसी केले नसल्याचे समोर आले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ३० एप्रिलनंतर या महिलांचे ₹१५०० कायमचे बंद; तुमचंही नाव आहे का?

या महिलांचा लाभ होणार कायमचा बंद (Ladki Bahin Yojana These Women Benefit Stopped)

लाडकी बहीण योजनेत केवायसी न केलेल्या महिलांना वगळण्यात येणार आहे. त्यामुळे २६ लाख महिलांचा लाभ कायमचा बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला फायदा झाला आहे. लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीला २ कोटी ४७ लाख लाभार्थी होते. यापैकी लाखो लाभार्थी अपात्र होण्याची शक्यता आहे. याआधी अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे परत न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला ऐहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १२४१५ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांकडून सरकार वसूली करणार आहे. चुकीची माहिती देणार, उत्पन्न जास्त असणे, सरकारची फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांकडून १६५ कोटी रुपये लाभ वसूल केले जाणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: १५०० की ₹३०००; लाडक्या बहिणींना या महिन्यात किती पैसे मिळणार? वाचा अपडेट

२६ लाख लाडक्या बहि‍णींनी केवायसी केली नाही

लाडकी बहीण योजनेत अद्याप २६ लाख ३४ हजार लाभार्थ्यांनी ईकेवायसी केलेली नाही. त्यांच्याकडे ईकेवायसीसाठी पुरेशी कागदपत्र नाहीत. हे लाभार्थी शेवटच्या ४ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता कमी आहे.दरम्यान, एप्रिलनंतर याबाबत माहिती समोर येईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! या महिलांकडून ₹१५०० परत घेणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com