Ladki Bahin Yojana: १५०० की ₹३०००; लाडक्या बहिणींना या महिन्यात किती पैसे मिळणार? वाचा अपडेट

Ladki Bahin Yojana March-April Installment Update: लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न महिलांना पडलेला आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?

या महिन्यात किती पैसे मिळणार?

फक्त या महिलांनाच मिळणार पैसे

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही मार्चचा हप्ता देण्यात आलेला नाही. महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, एकीकडे मार्चच्या हप्त्याबाबत प्रश्न विचारले जात आहेत तर दुसरीकडे मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: १२००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; २३ कोटी रुपये लाटले; धक्कादायक माहिती उघड

लाडक्या बहि‍णींना ₹१५०० की ₹३००० मिळणार? (Ladki Bahin Yojana Women will get 1500 Rupees or Not)

आता एप्रिल महिना संपत आला तरीही महिलांच्या खात्यात मार्चचाच हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मार्चचा हप्ता जरी दिला तरीही एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे या महिन्यात महिलांना १५०० रुपये की दोन महिन्याचे ३००० रपये मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मागच्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे हप्ते येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येते. परंतु महिन्याअखेरीस फक्त एकाच महिन्याचे पैसे जमा केले जातात. त्यामुळे या महिन्यात महिलांना नेमके किती पैसे मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत अधिकृत माहिती लवकरच दिली जाईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: १४ लाख लाडक्या बहिणींनी eKYC केलीच नाही, महत्त्वाची अपडेट आली समोर

फक्त या महिलांनाच मिळणार पैसे (Ladki Bahin Yojana These Women will Get Benefit)

लाडकी बहीण योजनेतून आता लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.अनेक महिला निकषात बसत नाही तर लाखो महिलांनी केवायसी केलेली नाही. केवायसीमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात पैसे येणं बंद झाले आहेत. अजूनदेखील अनेक महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. त्या महिलांना ३० एप्रिलनंतर लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ३० एप्रिलनंतर या महिलांचे ₹१५०० कायमचे बंद; तुमचंही नाव आहे का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com