Vande Bharat Express Mumbai To Solapur: मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार? पाहा किती आहे तिकीट?

Manasvi Choudhary

वंदे भारत ट्रेन

वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. वंदे भारत ट्रेनने प्रवास केल्याने अधिक सोपा आणि जलद होतो आहे.

Vande Bharat Express

सोपा प्रवास

देशात अनेक ठिकाणाहून वंदे भारत ट्रेन धावते. मुंबई - सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे मुंबईहून सोलापूर प्रवास करणे अत्यंत सोयीस्कर झाले आहे.

Vande Bharat Express

वेळ

मुंबई- सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे पूर्वीपेक्षा प्रवासांचा वेळ कमी झाला आहे. ४५५ किलोमीटरचे अंतर अवघ्या ६ तास ३० मिनिटांत पार होत आहे. त्यामुळे या वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Vande Bharat Express

महत्वाचे थांबे

मुंबई ते सोलापूर मार्गाने धावणारी वंदे भारत ट्रेन ही मुंबई सीएसएमटी स्टेशनमार्गे दादर, ठाणे आणि कल्याण या स्थानकांवर थांबते. नंतर ही ट्रेन पुणे स्थानकात थांबते. पुणेनंतर कुर्डुवाडी या स्थानकमार्गे थेट सोलापूर या स्थानकात पोहोचते.

Vande Bharat Express Mumbai To Solapur

या पर्यटनस्थळांना द्या भेट

या ट्रेनमुळे तुम्ही सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर या महत्वाच्या तीर्थस्थळांना भेट देऊ शकता.

Vande Bharat Express Mumbai To Solapur

तिकीट दर

मुंबई- सोलापूर वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवांशासाठी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार असे दोन पर्याय आहे. चेअर कार सीटसाठी १३०० रूपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार सीटसाठी प्रत्येकी २३६५ रूपये तिकीट आहे.

Vande Bharat Express Mumbai To Solapur

next: Homemade Hair Mask Tips: उन्हामुळे केस कोरडे पडलेत? 'हे' 3 होममेड हेअर मास्क लावा, सिल्की आणि शायनी होतील तुमचे केस

येथे क्लिक करा...