Homemade Hair Mask Tips: उन्हामुळे केस कोरडे पडलेत? 'हे' 3 होममेड हेअर मास्क लावा, सिल्की आणि शायनी होतील तुमचे केस

Manasvi Choudhary

केसांची काळजी

उन्हाळ्यात केसांची योग्य निगा राखण्यासाठी महिला अनेक घरगुती उपाय करतात. हेअर मास्क केसांना लावल्याने केस मऊ आणि मुलायम होतात. केसांचा पोत सुधारण्यास मदत होते.

Homemade Hair Mask Tips

हेअर मास्क

घरच्या घरी हेअर मास्क बनवण्याची पद्धत सोपी आहे. बाजारातील केमिकल युक्त हेअर मास्क पेक्षा तुम्ही घरगुती हेअर मास्क वापरा.

Homemade Hair Mask Tips

केळी - दही हेअरमास्क

केळी आरोग्यासाठी नाही तर केसांसाठी देखील उपयुक्त आहेत. पिकलेल्या केळीमध्ये नारळाचे तेल आणि दही मिक्स करून तुम्ही केसांना लावा. साधारण ३० ते ४० मिनिटे ही पेस्ट केसांवर ठेवल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा.

Homemade Hair Mask Tips

अंडी- दही हेअरमास्क

केसांना अंडी लावल्याने केस सिल्की होतात. केसांमधील कोरडेपणा कमी होतो. एका भांड्यात अंड आणि दही मिक्स करून हे मिश्रण तुम्ही केसांना लावू शकता.

Homemade Hair Mask Tips

एलोवेरा- दही हेअरमास्क

केसांसाठी कोरफड हे औषधी गुणधर्म आहे. कोरफड आणि दही एकत्र मिक्स करून केसांना लावल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते. सिल्की तसेच केस दाट होण्यास मदत होते.

Homemade Hair Mask Tips

अशी घ्या काळजी

कोणताही होममेड हेअर मास्क लावल्यानंतर केस कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने धुवावे.

Homemade Hair Mask Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Hair Care Tips | Yandex

next: 5 Fruits To Avoid After Non-Veg: नॉनव्हेज खाल्ल्यानंतर चुकूनही 'ही' 5 फळे खाऊ नका, शरीरात तयार होऊ शकतं विष

येथे क्लिक करा...