Manasvi Choudhary
रात्री जेवल्यानंतर फळे खाण्याची अनेकांना सवय असते. मात्र तुम्हाला माहितीये का? नॉन व्हेज खाल्ल्यानंतर फळे खाल्ल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
नॉन व्हेज खाल्ल्यानंतर कोणती पाच फळे खाऊ नये हे जाणून घेऊया.
आयुर्वेदानुसार,मासांहारातील प्रथिने आणि फळांमधील आम्ल एकत्र आल्यास पचनक्रियेस अडथळा निर्माण होतो यामुळे पोटात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात.
नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आंबट फळे कधीच खाऊ नये. यामुळे पोटात अॅसिड तयार होऊ शकते.
कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने पोटात गॅस होतो.
अननसातील एन्झाइम्स आणि मासांहारातील प्रथिने हे एकत्र झाल्याने पचनाला त्रास होतो ज्यामुळे पोटफुगी होते.
पेरूमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते मासांहार पदार्थ खाल्ल्याने बद्धकोष्ठता होण्याचा त्रास उद्भवतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.