Manasvi Choudhary
लग्नात इतरांपेक्षा उठून दिसण्यासाठी तुम्ही केवळ ड्रेसिंग स्टाईलच नाही तर हेअरस्टाईलकडेही लक्ष दिले पाहिजे.
अनेकदा महिलांना लग्नात नऊवारी साडीवर केसांचा लूक कसा करायचा? असा प्रश्न पडतो.
यासाठी आज आम्ही सोप्या नऊवारी साडीवर सुंदर दिसतील अश्या हेअरस्टाईल्स सांगणार आहोत.
नऊवारी साडी नेसल्यावर तुम्हाला सिंपल मराठमोळा लूक हवा असेल तर तुम्ही अंबाडा बांधून त्यावर फुलांचा गजरा माळू शकता.
तुमचे केस लांब असतील तर तुम्ही हाफ क्लिप स्टाईल करून खालच्या केसांना कर्ल्स करून मोकळे ठेवू शकता.
साडीवर कोणतीही स्टाईलही ही उठून दिसते यासाठी तुम्ही केसांची खजूर किंवा सागर वेणी देखील घालू शकता.
सिंपल वेणी बांधून तु्म्ही त्यावर गजरा किंवा हेअर एक्सेसिरिज ट्राय करू शकता.
फ्रेंच बन बिथ गजरा ही स्टाईल महिलांसाठी कायमच ट्रेंडमध्ये असते. तुम्ही साडीवर खास ही स्टाईल केल्यास तुमचा लूक उठून दिसेल.