Manasvi Choudhary
केसगळतीच्या समस्येने अनेक महिला व पुरूष वैतागले आहेत. चुकीची जीवनशैली केसगळतीच्या समस्येचे प्रमुख कारण बनली आहे.
धूळ, प्रदूषण, वातावरणातील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीचा परिणाम केसांवर होतो आहे.
अनेकजण केसांची गळती रोखण्यासाठी महागडे शॅम्पू, कंडीशनर वारतात मात्र केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे केस खराब होतात, कोरडे होतात आणि गळतात.
केस गळतीवर उपाय म्हणून तुम्ही सकाळी हेल्दी ड्रिंक प्यायल्यास फायदा होईल. शरीराला आतून पोषण मिळेल.
स्वयंपाकघरातील तीन पदार्थांनी बनलेले हे ड्रिंक तुम्ही प्यायल्यास केसांची गळती थांबेल. कढीपत्ता, आवळा पावडर आणि पाणी हे साहित्य घ्या.
सर्वातआधी कढीपत्ता आणि आवळा पावडर हे पाण्यात मिक्स करा. नंतर हे पाणी तुम्ही फ्रिजमध्ये ४ ते ५ तास ठेवा. दररोज तुम्ही हे थंड ड्रिंक प्यायल्याने केस गळण्यापासून रोखता येईल.
दररोज सकाळी हेल्दी ड्रिंक प्यायल्याने केसांची मुळापासून वाढ होईल तसेच केस मजबूत होतील.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.