Manasvi Choudhary
निरोगी केसांसाठी महिला विशेष काळजी घेतात. अनेक घरगुती उपाय करतात.
शेवग्याच्या पानांचा उपयोग त्वचेसाठी नाही तर केसांसाठी देखील फायदेशीर आहे.
दाट आणि लांब केसांसाठी शेवग्याच्या पानांचा वापर तुम्ही घरगुती उपाय म्हणून करू शकता.
शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्वे, खनिजे, पोषणद्रव्ये असतात जी केसांच्या मुळांना पोषण देतात ज्यामुळे नैसर्गिकरित्या केसांची वाढ होते.
आठवड्यातून दोन वेळा तुम्ही शेवग्याच्या पानांची पेस्ट करून केसांना लावा.
शेवग्याच्या पानांचा ज्यूस हेल्दी ड्रिंक म्हणून पितात. उन्हाळ्यात तुम्ही शेवग्याच्या पानांची स्मूदी घरी ट्राय करू शकता.
शेवग्याच्या पानांचा तेल कोमट करून केसांना लावा यानंतर १० ते १५ मिनिटांनी केस कोमट पाण्याने धुवा. यामुळे केसांमधील रक्ताभिसरण सुरळीत होते.
शेवगाचे तेल नारळ तेलात मिक्स करून केसांना लावल्याने केसांची चमक वाढते. केस गळती कमी होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.