Gold Rate Today: दरवाढीचा भडका! चांदी ३० हजारांनी महागली, तर सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ, वाचा लेटेस्ट दर

Gold Rate Today Hike: सोन्याच्या दरात आज विक्रमी वाढ झाली आहे. प्रति तोळ्यामागे सोन्याचे दर १२ हजारांनी महागले आहेत. तर चांदीचे दर ३०,००० रुपयांनी महागले आहेत.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याच्या दरात वाढ

प्रति तोळ्यामागे १३ हजारांनी वाढले

चांदीच्या दरात ३०,००० रुपयांची वाढ

सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना झटका

सोन्याच्या दरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसत आहे.पीएम मोदींनी केलेल्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहेत. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे हे दर घसरतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कालपासून सलग दोन दिवस सोन्याचे दर वाढले आहेत. आज सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

Gold Rate Today
Gold Rate : ऐन लग्नसराईत ग्राहकांची चिंता वाढली! सोनं-चांदीचे दर गगनाला भिडले, आठवडाभरात असा होता बाजार भाव

सोनं प्रति तोळ्यामागे १२ हजारांनी महागलं (Gold Price Hike by 12,000 Rupees)

सोन्याचे दर काल १,५१०,०० रुपये होते. आज सकाळी बाजारपेठ उघडताच त्यात बारा हजार वाढ झाली आहे. सोन्याचे १ लाख ६३००० वर पोहोचले आहेत. तर चांदी ३०००० रुपयांनी महागली आहे. हे दर २ लाख ६८ हजार वरून दर २ लाख ९८ हजार वर जाऊन पोहोचले आहेत. सोने चांदीच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.

दरम्यान, सोन्याचे दर वाढत असले तरीही व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे.

Gold Rate Today
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ८०० रूपयांनी स्वस्त, वाचा जळगाव-पुण्यातील ताजे दर

याबाबत राजेश रोकडे, चेयरमन ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमिस्टक कौन्सिल यांनी माहिती दिली आहे. सोन्याच्या आयात शुल्कात वाढ झाल्याने, आजपासून सोनं प्रति दहा ग्रॅम १३ हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे.सोने- चांदीवरील आयातशुल्क मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर होणार आहे.आज बाजारपेठेत सोनं 12 ते 13 लाख प्रतीकिलोने महागणार आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सीलची महत्वपूर्ण बैठक बोलवली आहे. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलनं पंतप्रधानांची भेटीची वेळ मागितली आहे. सोन्याचं आयात शुल्क पाच टक्क्यांवरुन १० टक्के झाले आहे. ॲग्रीकल्चर सेस १ टक्क्यांवरून पाच टक्के झालेय, ड्युटी १५ टक्के झालीय… सर्व मिळून १८ टक्के कर वाढले, पूर्वी प्रति किलो साडेतेरा लाख रुपये कर लागायचे ते आता २७ लाख कर लागणार आहे. देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाच्या आम्ही पाठीशी आहोत.मात्र कुठेतरी बेरोजगारीचा संकट असल्यामुळे त्यासाठी कुठल्यातरी मधला मार्ग काढावा किंवा वीन वीन सिच्युएशन मध्ये निर्णय घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today: सोनं ₹१५०० तर चांदी १० हजारांनी महागली; सुवर्णनगरीतील १ तोळ्याचे दर किती? वाचा सविस्तर

भारतभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाचे पडसाद पाहायला मिळाले. काही राज्यांमध्ये खरेदी ही दहा ते पंधरा टक्क्याने वाढल्याची पाहायला मिळाले. तेच महाराष्ट्र या भागामध्ये मात्र दहा टक्के घट झाल्याचेही पाहायला मिळाले, असं त्यांनी म्हटलं आहे.

Gold Rate Today
Gold-Silver Price Hike: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता सोनं-चांदी खरेदी करणं आणखी महागणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com